BARC Recruitment 2020: भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरमध्ये स्टायपेंड ट्रेनी पदासाठी नोकर भरती, 31 जानेवारी पर्यंत करता येणार अर्ज
Representational Image (Photo Credits: File Photo)

BARC Recruitment 2020: जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकर भरतीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुसार BARC ने स्टायपेंड ट्रेनीच्या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या अंतर्गत एकूण 156 रिक्त जगांवर नोकर भरती होणार आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना या नोकर भरतीसाठी अर्ज करायचा असेल त्यांनी अधिकृत वेबसाइट BARC.gov.in ला भेट द्यावी.(Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; Maharashtra Metro Rail Corporation Limited मध्ये विविध पदांसाठी नोकरभरती; जाणून घ्या पदांची नावे, पात्रता व कुठे कराल अर्ज)

अर्ज करणाऱ्या उमेदावारांनी लक्षात ठेवावे की अर्जाची अंतिम तारखी 31 जानेवारी 2021 आहे. त्यानंतर कोणताही अर्ज स्विकारला जाणार नाही आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित क्षेत्रात ट्रेनिंग ही दिली जाणार आहे. त्यांना तारापूर, कलपक्कम येथे ट्रेनिंग घेता येणार आहे. परंतु अर्ज करण्यापूर्वी नोकर भरती संदर्भातील पत्रक काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कारण नोकर भरतीसाठी योग्य शिक्षण, वय आणि अटींनुसारच उमेदवारांची निवड केली जाणार आहे. तर जाणून घ्या या नोकर भरती संदर्भात महत्वाची माहिती.(BECIL Recruitment 2020: डेटा एन्ट्री ऑपरेटर, ऑफिस असिस्टेंटसह 749 पदांवर नोकर भरती, जाणून घ्या अधिक)

-नोकर भरती संदर्भात अधिक माहिती

>>स्टायपेंड ट्रेनी कॅटेगरी: 1-50 पोस्ट

>>स्टायपेंड ट्रेनी कॅटेगरी: 106 पोस्ट

-महत्वपूर्ण तारखा

>> अर्ज सुरु होण्याची तारीख- 15 डिसेंबर, 2020

>> अर्ज करण्याची अंतिम तारखी-31 जानेवारी 2021

उमेदवारांना लक्षात असू द्या की, अर्ज करताना कॅटेगरी वन साठी त्यांचे वय 18 ते 24 वर्षादरम्यान असावे. तर श्रेणी II साठी 18 ते 22 वर्ष वय आणि अन्य आरक्षित वर्गासाठी नियमानुसार सूट दिली जाणार आहे.

तसेच उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि स्किल टेस्टच्या आधारवर होणार आहे. लेखी परीक्षा दोन टप्प्यात होणार आहे. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की त्यांनी इंटरव्यूसाठी तुमच्या लेखी परीक्षेच्या गुणाला कोणतेही वेटेज नसणार आहे. या संबंधित एनआरबीचा अंतिम निर्णय असणार आहे.