Maharashtra METRO Recruitment 2020: कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) जनतेला अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला आहे. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे बंद पडले. आता कुठे अर्थव्यवस्था रुळावर येत आहे मात्र अजूनही बेरोजगारीची समस्या भेडसावत आहे. आता महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (Maharashtra Metro Rail Corporation Limited) मध्ये विविध पदाच्या 139 जागा भरण्यात येणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे. यासाठी अर्ज करण्याची मुदत 14 डिसेंबर 2020 रोजी सुरु होणार असून, अंतिम तारीख 21 जानेवारी 2020, रात्री 11.59 पर्यंत असणार आहे.
जाणून घ्या पदांची नावे व शैक्षणिक पात्रता –
- पदाचे नाव :- टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) – 23 पदे
शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण
- पदाचे नाव :- टेक्निशियन (फिटर) – 13 पदे
शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण
- पदाचे नाव :- टेक्निशियन (सिव्हिल) - 02 पदे
शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण
- पदाचे नाव :- टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स) – 13 पदे
शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण
- पदाचे नाव :- टेक्निशियन (AC & Reff.)- 02 पदे
शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण
- पदाचे नाव :- स्टेशन कंट्रोलर/ट्रेन ऑपरेटर/ट्रेन कंट्रोलर – 56 पदे
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून 3 वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)
- पदाचे नाव :- सेक्शन इंजिनियर (इलेक्ट्रिकल) – 04 पदे
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून 4 वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)
- पदाचे नाव :- सेक्शन इंजिनियर - (IT) – 01 पदे
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून 4 वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)
- पदाचे नाव :- सेक्शन इंजिनियर (इलेक्ट्रॉनिक्स) – 05 पदे
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून 4 वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)
- पदाचे नाव :- सेक्शन इंजिनियर (मेकॅनिकल) – 1 पद
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून 4 वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)
- पदाचे नाव :- ज्युनियर इंजिनियर (इलेक्ट्रिकल) – 08 पदे
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून 3 वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)
- पदाचे नाव :- ज्युनियर इंजिनियर (इलेक्ट्रॉनिक्स) – 03 पदे
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून 3 वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)
- पदाचे नाव :- ज्युनियर इंजिनियर (मेकॅनिकल) – 06 पदे
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून 3 वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)
- पदाचे नाव :- ज्युनियर इंजिनियर (सिव्हिल) – 2 पदे
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून 3 वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)
वयोमर्यादा: 21 जानेवारी 2021 रोजी 18 ते 28 वर्षे असावीत. यामध्ये एससी/एसटी- 5 वर्षे, ओबीसी - 3 मध्ये वर्षांची सूट देण्यात आली आहे.
ऑनलाईन अर्जासाठी :- https://bit.ly/3oyyauo
अधिक माहितीसाठी :- https://bit.ly/33Uxs2G आणि https://bit.ly/39RhVVf या लिंक्सवर क्लिक करा.
दरम्यान, काल प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवक पदभरती प्रक्रियासुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. मा.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. पवित्र पोर्टलद्वारे उर्वरीत सुमारे 6,000 पदांसाठी शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू होत आहे.