IRCTC चे अधिकृत ऐजंट बनून प्रत्येक महिन्याला पैसे कमवा, जाणून घ्या ही योजना
Image Used for Representational Purpose only | (Photo Credits: File Photo)

रेल नेटवर्क इंडियन आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अँन्ड टुरिझमने तुमच्यासाठी एक खास ऑफर आणली आहे. आयआरसीटीसी (IRCTC) भारतीय रेल्वे तिकिट बुकिंगच्या माध्यमातून 55 टक्के प्रवासी तिकिटांसाठी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करतात.

जर तुम्ही आयआरसीटीसीचे अधिृत ऐजंट बनलात तर तुम्हाला महिन्याला 80 हजार रुपये मिळू शकतात असे दैनिक जागरण यांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. तसेच तत्काळ, वेटिंद आणि आसएसी सारखी तिकिटे अधिकृत ऐजंटच्या माध्यमातून बुकिंग केली जातात. त्याचसोबत त्यांना 24 तासा आणि 7 दिवसाचे सर्च इंजिन बुकिंग सिस्टिम देण्यात येते. ऐजंट व्यक्ती तिकिट बुकिंगस बस, हॉटेस किंवा टूर पॅकेजसुद्धा बुक करु शकतो.(IRCTC Bharat Darshan: 30 मे पासून सुरु होणार आयआरसीटीसी भारत दर्शन टुर; पहा कसे, कुठून कराल बुकींग)

आयआरसीटीसीचे एजेंट बनल्यावर तुम्हाला सर्व प्रकारची तिकिटे बुकिंग करता येतात. तसेच तिकिट रद्द सुद्धा करण्याचा अधिकार तुम्हाला दिला जातो. तुम्हाला रेल्वेचे अधिकृत ऐजंट बनायचे असल्यास अधिकृत प्रिंसिपल प्रोवाइडर सोबत एक करार करावा लागतो. तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावरुन मिळवू शकतात.