तत्काळ तिकिट बुकिंगसाठी वेळ बदलली, जाणून घ्या नवे नियम आणि तिकिट दर
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

भारतीय रेल्वे (Indian Railway) तिकिट बुकिंगसाठी प्रशासनाकडून विविध प्रकारच्या सोई प्रवाशांना उपलब्ध करुन दिल्या जातात. त्याचसोबत ज्या प्रवाशांना अचानकपणे एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असतो त्यांच्यासाठी तत्काळ तिकिट बुकिंगची सुविधा रेल्वेकडून सुरु करण्यात आली आहे.

तर 7 मे पासून तत्काळ तिकिट बुकिंगसाठी वेळ बदलण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना तत्काळ तिकिट सकाळी 11 वाजता न मिळता 11.30 वाजल्यापासून देण्यात येणार आहे. आयआरसीटीसीचे अधिकृत ऐजंटना सकाळी 10 ते 12.00 मध्ये तत्काळ तिकिंट बुकिंग करण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे. तत्काळ तिकिट बुकिंग करताना प्रवाशाला ओळखपत्र दाखवणे गरजेचे आहे. त्याचसोबत तत्काळ तिकिटाअंतर्गत फक्त चार प्रवाशांसाठी एक पीएनआर क्रमांकावर तिकिट खरेदी करता येते.(IRCTC चे अधिकृत ऐजंट बनून प्रत्येक महिन्याला पैसे कमवा, जाणून घ्या ही योजना)

त्याचसोबत द्वितीय श्रेणीतील तत्काळ तिकिट बुकिंगसाठी 10 टक्के आणि सर्व वर्गांसाठी एकूण 20-30 टक्के शुल्क स्विकारला जाणार आहे. आयआरसीटीसच्या माध्यमातून तिकिट बुकिंग केल्यास दुसऱ्या श्रेणीतील प्रवाशांकडून 10-15 रुपये तत्काळ तिकिटासाठी अधिक घेतले जातात. स्लीपर क्लाससाठी 90-175 रुपयांसाठी अतिरिक्त शुल्क स्विकारले जातात.