प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

पोस्ट ऑफिसने (Post Office) ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरु केली आहे. तर इंडियन पोस्टल ऑर्डर (Indian Postal Order)चा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने खरेदी करता येणार आहे. त्याला eIPO असे म्हटले जाते. त्याचसोबत सरकारी नोकरीसाठी अर्ज केला असल्यास त्याचे शुल्क भरण्यासाठी पोस्टल ऑर्डरची गरज भासते. त्यामुळे अर्जदात्याला आता eIPO च्या माध्यमातून पोस्टल ऑर्डर खरेदी करता येणार आहे. अर्ज करणाऱ्या व्यक्तिला 10, 20 आणि 50 रुपयांपर्यंत ऑनलाईन पोस्टल खरेदी करता येणार आहे.

RTI फाइल करण्यासाठी सुद्धा eIPO चा उपयोग करु शकता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला भारतीय डाक यांच्या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. तर अधिक माहिती www.indiapost.gov.in या संकेतस्थळावर युजर्सला कळण्यास मदत होणार आहे. रजिस्ट्रेशनसाठी तुमचा ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक, पत्ता, जन्मतिथी यांची संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे.(पोस्टात फक्त 20 रुपयात सुरु करा बचत खाते, मिळतील 'या' विविध सुविधा)

त्याचसोबत बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा उपयोग करुन या सेवेचा लाभ घेता येणार आहे. तसेच नेट बँकिंगच्या सेवेनेसुद्धा तुम्हाला पोस्टल ऑर्डरचे पैसे भरता येणार आहेत. पैसे भरल्यानंतर तुम्हाला रिसिप्ट मिळेल त्याची प्रिंट काढून तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकणार आहात.