पोस्टात फक्त 20 रुपयात सुरु करा बचत खाते, मिळतील 'या' विविध सुविधा
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

पोस्टामध्ये जर बचत खाते सुरु करायचे असल्यास तुम्हाला ते 20 रुपयात सुरु करता येणार आहे. तसेच या बचत खात्यावर विविध सुविधांसह भरघोस व्याजाची रक्कम मिळते. तर बचत खाते सुरु करण्यासाठी कमीतकमी 50 रुपये तुमच्या खात्यात असणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्हाला बँकेकडून देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा पोस्टाकडून दिल्या जातात. त्यामध्ये चेकबुक आणि ATM सुद्धा ग्राहकाला दिले जाते.

या बचत खात्यासाठी तुम्हाला 4 टक्के व्याजदर लागू केला जातो. मात्र चेकबुक नको असल्यास तुम्हाला बचत खाते 20 रुपयांमध्ये सुरु करता येत नाही. त्यासाठी तुम्हाला खात्यात 50 रुपये असणे आवश्यक आहे. चेकबुकची सुविधा तुम्हाला हवी असल्यास 500 रुपये भरुन खात्यात तुम्हाला कमीतकमी 500 रुपये असावे लागतात. तसेच दोन-तीन जण एकत्र मिळून संयुक्त खातेसुद्धा सुरु शकतात.(नोकरीला कंटाळलात? मग स्वत:चे सरकारमान्य Post-Office सुरु करा, कमवा बक्कळ पैसा)

पोस्टात खाते सुरु करण्यासाठी तुम्हाला फॉर्म भरुन द्यावा लागतो. तसेच KYC कागदपत्रे तुम्हाला सादर करणे आवश्यक आहे. तर पोस्टातील बचत खात्यातील 10 हजार रुपयापर्यंतच्या रक्कमेवरील व्याजावर टॅक्स लावला जात नाही.