ऑनलाईन व्यवहार करताना फोनवर OTP येत नसल्यास SBI च्या वेबसाईटवर अशी करा तक्रार
State Bank of India (SBI) | (Photo Credits: PTI/File)

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) मध्ये तुम्ही आता ऑनलाईन (Online) माध्यमातून खाते ओपन करु शकता. ओटीपी (OTP) च्या माध्यमातून अनेक बँकेसह इतर कामे घरबसल्या करतात येतात. मात्र काही वेळेस ओटीपी न मिळाल्याने कामं करताना अडथळे येतात. तुम्हालाही अशी समस्या भेडसावत असेल तर तुम्ही त्यासंदर्भात बँकेत तक्रार करु शकता. दरम्यान, ओटीपीची समस्या कसी दूर करायची आणि त्याबद्दल तक्रार दाखल कशी करावी, हे जाणून घेऊया...

प्रत्येक व्यवहारासाठी ओटीपी महत्त्वाचा असतो. त्याशिवाय कोणतेही काम करणे शक्य होणार नाही. तसंच फसवणूक टाळण्यासाठी ओटीपी समस्या त्वरीत सोडवणे गरजेचे आहे. स्टेट बँकेने दिलेल्या माहितीनुसार, नेटवर्कमुळे अनेकदा ओटीपी उपलब्ध होत नाही. अशावेळी https://crcf.sbi.co.in/ccf/ येथे तक्रार दाखल करा. (SBI Bank Offers: एसबीआयने खातेधारकांसाठी सुरू केली 'ही' नवी ऑफर, आज ट्विटरवरून केली घोषणा)

ओटीपी न मिळाल्याने अनेक व्यवहार अडतात. तसंच फसवणुकीची शक्यता असते. सायबर क्राईममध्ये तुमच्या सिमचे क्लोन केलेले सिम घेऊन लोक तुमच्या खात्यातून व्यवहार करतात. त्यामुळे ओटीपी तुम्हाला मिळण्याऐवजी त्या व्यक्तीला मिळतो आणि तुमच्या खात्यातून पैसे कट होतात. याशिवाय ओटीपीमुळे तुमचे बँक अकाऊंट डिटेल्स समोरील व्यक्तीला कळू शकतो. त्यामुळे ओटीपी मिळत नसल्यास लगेचच तक्रार नोंदवा.

ओटीपीच्या समस्या यापूर्वी अनेक युजर्सने एसबीआयला टॅग करत ट्विटच्या माध्यमातून शेअर केल्या आहेत. अशावेळी बँकेकडूनही ट्विटद्वारे उत्तर दिले जाते. परंतु, ऑनलाईन व्यवहार करताना फसवणूक टाळण्यासाठी अधिक सजग राहणे गरजेचे आहे.