SBI (Photo Credits: Facebook)

स्वातंत्र्य दिन 2021 च्या (Independence Day 2021) निमित्ताने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर (Offer) दिली आहे.  याअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (SBI) गृहकर्ज (Home loan) घेणाऱ्या लोकांना लाभ मिळणार आहे. म्हणजेच भाड्याच्या घरातून सुटका मिळण्याबरोबरच तुमच्या घराचे स्वप्नही कमी खर्चात पूर्ण होईल. एसबीआयने शुक्रवारी गृहकर्जासाठी नवीन ऑफर सुरू केली. या अंतर्गत गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना झी प्रोसेसिंग फी भरावी लागणार नाही. या संदर्भात एसबीआयने आज ट्विट (Tweet) केले आहे. या स्वातंत्र्यदिनी गृहकर्जावर शून्य प्रक्रिया शुल्कासह आपल्या स्वप्नांच्या घरात जा. आपल्या स्वप्नांचे घर खरेदी करून भाड्यातून मुक्त व्हा, असे पोस्ट करत या ऑफरची माहिती दिली आहे.

एसबीआय आपल्या महिला ग्राहकांना गृहकर्जावर 5 बीपीएस व्याज सवलत देते आहे. तर एसबीआय योनो वापरकर्ते 5 बीपीएस व्याज सवलत देखील घेऊ शकतात. SBI ने गृहकर्जासाठी 7208933140 क्रमांक जारी केला आहे, ज्यावर फक्त मिस्ड कॉल देऊन सर्व माहिती मिळवता येते.

आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये बँकेने 20,410 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. जो मागील आर्थिक वर्षातील 14,488 कोटी रुपयांच्या तुलनेत होता. गेल्या आर्थिक वर्षात बँकेची सकल अनुत्पादक रक्कम (NPA) एक वर्षापूर्वी 6.15 टक्क्यांवरून 4.98 टक्के झाली आहे. त्याच वेळी वर्षभरात बँकेने 34,000 कोटींचे कर्ज माफ केले आहे. सध्या बँकेच्या 406 शाखा तोट्यात चालल्या आहेत.

SBI गृहकर्जाच्या अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी 

कर्ज घेणाऱ्याकडे ओळखपत्र असणे गरजेचे आहे. तसेच एसबीआय होम लोन फॉर्म असावा. सोबत तीन पासपोर्ट आकाराचे फोटो, ओळख पुरावा म्हणजे पॅन, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदान ओळखपत्र यापैकी कोणतेही एक देणे आवश्यक आहे. कर्जासाठी पत्त्याचा पुरावा पासपोर्ट,ड्रायव्हिंग लायसन्स, आधार, युटिलिटी बिल, वीज बिल, टेलिफोन बिल, पाणी बिल आणि पाइप गॅस बिल देणे आवश्यक आहे.