पासपोर्ट (Image Credits: PTI)

कोविड-19 संकटानंतर (Covid 19 Pandemic) हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसला तरी लसीकरणामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) लेटेस्ट अपडेटनुसार, देशात कोविड19 लसीकरणाने (Covid19 Vaccination) 82 कोटींचा टप्पा पार केला आहे. 20 कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोसेस मिळाले आहेत. त्यामुळे परदेश गमनाचा मार्ग मोकळा झाला आहे. काम, शिक्षण किंवा पर्यटनासाठी लोक परदेसी प्रवास करत आहेत. यासाठी व्हिसा, आर्थिक नियोजन करत असताना अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती त्वरीत करणे गरजेचे आहे. तुमचा पासपोर्ट (Passport) कोविड-19 व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटला (Covid 19 Vaccination Certificate) लिंक करणे आवश्यक आहे. तर जाणून घ्या त्याची प्रक्रीया...

पासपोर्ट आणि कोविड-19 व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट लिंक:

दुसऱ्या देशात प्रवास करण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिसा ही आवश्यक कागदपत्रे आहेत. कोरोना काळात कोविड-19 मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमचे लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र सोबत बागळणे आवश्यक आहे. मात्र कोणत्याही अडचणीशिवाय परदेश प्रवास करम्यासाठी तुमचा पासपोर्ट आणि लस प्रमाणपत्र ताबडतोब लिंक करा. यासाठी तुम्ही कोविनच्या अधिकृत वेबसाईट www.cowin.in ला भेट देऊ शकता. (Passport Application: नवीन पासपोर्ट काढण्यासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक? येथे पहा संपूर्ण यादी)

Passport आणि Vaccine Certificate लिंक करण्याच्या काही स्टेप्स:

# www.cowin.in या वेबसाईटमध्ये लॉगईन केल्यानंतर होमपेजवरील 'support' पर्यायावर क्लिक करा.

# यानंतर तुम्हाला 3 पर्याय दिसतील. त्यापैकी 'certificate corrections' वर क्लिक करा.

# यानंतर तुम्हाला तुमच्या व्हॅक्सिनेशनचे स्टेटस दिसेल.

# त्यानंतर 'Raise an issue' या पर्यायावर क्लिक करा.

# 'Add Passport details' हा पर्याय निवडा.

# तुमचे नाव आणि पासपोर्ट नंबर भरा.

# ही माहिती सब्मिट केल्यानंतर तुमच्या रजिस्ट्रर मोबाईल नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.

# यानंतर तुम्ही तुमचे व्हॅक्सिन सर्टिफिकेट कोविन अॅपवरुन डाऊनलोड करा.

# या नवीन सर्टिफिकेटमध्ये तुमचे पासपोर्ट डिटेल्स अपडेट झालेले असतील.

अशा प्रकारे पासपोर्ट आणि कोविड-19 व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट लिंक करुन तुम्ही तुमचा परदेश प्रवास सुसह्य करु शकता.