'Raise an Issue' button in CoWIN portal (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात जानेवारी 2021 पासून लसीकरण सुरु झाले. 21 जून पासून राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रमाला (National COVID Vaccination Program) सुरुवात होणार आहे. दरम्यान, कोविड-19 लस घेतल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला लसीकरणाचे प्रमाणपत्र दिले जाते. परंतु, त्या प्रमाणपत्रामध्ये काही माहिती चुकीची छापून आल्याच्या अनेक तक्रारी गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी सरकारने कोविन पोर्टल (CoWIN Portal) मध्ये एक नवीन फिचर अॅड केले आहे. त्यामुळे आता लस घेतलेल्या व्यक्ती आपल्या प्रमाणपत्रातील चुका कोविनच्या वेबसाईटवर जाऊन दुरुस्त करु शकतात.

लसीकरण प्रमाणपत्रात नाव, जन्मतारीख आणि लिंग यामध्ये चुका असतील. तर त्या तुम्ही दुरुस्त करु शकता. http://cowin.gov.in  या संकेतस्थळावर जाऊन तुमची समस्या मांडा, असे आरोग्यसेतुच्या ट्विटर हँडलवर सांगण्यात आले होते. मात्र ते नेमके कसे करायाचे ते जाणून घेऊया. खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन तुमच्या लसीकरण प्रमाणपत्रातील चुका दुरुस्त करु शकता:

# www.cowin.gov.in. या संकेतस्थळाला भेट द्या.

# तिथे तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकून साईन इन करा.

# त्यानंतर "Account Details" मध्ये जा.

# जर कोविड-19 ची पहिली किंवा दुसरी लस घेतली असेल तर तुम्हाला तिथे "Raise an Issue" हे बटण दिसेल.

# "Raise an Issue" वर क्लिक करा आणि "Correction in Certificate" हा पर्याय निवडा.

# तुमचे नाव, जन्मतारीख आणि लिंग यामधील चुका तुम्ही दुरुस्त करु शकता.

# लस घेतलेली व्यक्ती कोणत्याही दोनच गोष्टींमध्ये चूक सुधारु शकते.

# issue raise केल्यानंतर अधिकाऱ्यांकडून तुम्हाला उत्तर दिले जाईल.

(Covid-19 Vaccine Certificate सोशल मीडियावर शेअर केल्यास होऊ शकते फसवणूक; सरकारचा ट्विटद्वारे इशारा)

दरम्यान, देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आली असली तरी अद्याप संकट टळलेले नाही. तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळेच लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहे. सध्या कोविड पोर्टलसोबत आरोग्य सेतू आणि उमंग या अॅप्सचा वापर करुन तुम्ही कोविड-19 लसीकरणासाठी स्लॉट बुक करु  शकता. आतापर्यंत देशात 23,90,58,360 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.