How to Check EPFO Balance Via Message: घरबसल्या आपला पीएफ बॅलेन्स कसा चेक कराल? फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
Mobile Phone (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

नोकरदार वर्ग म्हटला पगारात PF सेवा असणे हे खूप जरुरीचे आहे. कारण पीएफ ही तुमच्या भविष्याची तरतूद आहे. मात्र हा पीएफ वेळेवर जमा होत आहे की नाही तो किती आणि कसा जमा होतो याची प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे. तसेच अलीकडच्या काळात बदलत्या जगासोबत पुढे जात अत्याधुनिक टेक्नोलॉजीचा वापर करत डिजिटल पद्धतीने पीएफ पाहता येते. यामुळे तुम्हाला कधीही, केव्हाही पीएफची (EPF Balance) माहिती मिळते. तसेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सुद्धा हा बॅलेन्स तपासता येईल.

EPFO च्या ट्विटर पेजद्वारे याबाबत माहिती दिली आहे. घरबसल्या आपल्या मोबाईलवरून तुम्हाला त्वरित EPF ची माहिती मिळू शकते. त्यासाठी काही ठराविक स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. मेसेजद्वारे तुम्ही पुढील पद्धतीने तुमचा PF बॅलेन्स माहिती करुन घेऊ शकता.

Message द्वारे:

तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरून '7738299899' वर EPFOHO UAN LAN असा संदेश पाठवणे. त्यावरून तुम्हाला त्वरित त्याचा रिप्लाय येऊन त्यामध्ये तुमच्या पीएफ बॅलेन्सची माहिती मिळेल.हेदेखील वाचा-UAN क्रमांक ॲक्टिव्ह करण्यासाठी 'या' सोप्प्या स्टेप्स फॉलो करा

Missed Call द्वारे:

त्याचबरोबर तुम्ही 011-22901406 यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरुन मिस्ड कॉल देऊन तुमच्या पीएफ बॅलेन्सची माहिती मिळवू शकता.

तसेच तुम्ही घरी बसून KYC माहिती संबंधित UAN EPFO पोर्टलच्या माध्यमातून अपडेट करता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला UAN ची गरज भासणार आहे. EPFO युएएन पोर्टलवर लॉग इन करुन केवायसी अपडेट करण्यासाठी महत्वाची कागदपत्रे सुद्धा अपलोड करावी लागणार आहेत. त्यानंतर लॉगिन होईल. केवायसी माहितीसाठी तुम्हाला आधार क्रमांक, पॅन क्रमांक आणि बँक खाते क्रमांक द्यावा लागणार आहे.