How to Apply For Ration card Transfer: दुसर्‍या राज्यात गेल्यास रेशन कार्ड ट्रान्सफर कसं कराल? आवश्यक कागदपत्रं कोणती?
रेशनाकार्ड (Photo Credits- Facebook)

भारतामध्ये रेशन कार्ड (Ration Card) हे एक महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार कडून आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणार्‍या नागरिकांच्या रेशन कार्ड वर कधी मोफत तर माफक दरात अन्न धान्य पुरवले जातं. राज्य सरकारकडून प्रत्येक ठिकाणी ते जारी केले जातं. कोरोना संकट काळात दारिद्र रेषेखाली असलेल्या नागरिकांना सरकारने अन्न धान्य पुरवले त्यानंतर वन नेशन वन रेशन कार्ड स्कीमची देखील घोषणा केली. सध्या देशात 3 प्रकारची रेशन कार्ड उपलब्ध आहे. आर्थिक स्तरानुसार ती वेगवेगळी आहेत. पण तुम्ही रेशन कार्डचा वापर करत असाल आणि बदलत्या परिस्थितीनुसार तुम्हांला रहायचं ठिकाणं, राज्य बदलावं लागत असेल तर रेशन कार्ड कसं बदलायचं? हा प्रश्न सतावतोय का? मग पहा त्याची माहिती.

रेशन कार्ड बनवण्यासाठी तुम्ही भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे. तुम्हांला ते एका राज्यातून दुसर्‍या राज्यात गेल्यावर ट्रान्सफर करायचं असल्याच तुमच्या नजिकच्या रेशन कार्ड संबंधित कार्यालयात जावं लागेल. बदल करून घेण्यासाठी एक अर्ज दाखल करावा लागतो. तसेच रहिवासी पत्त्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. या बदलासाठी तुम्हांला काही शुल्क कार्यालयामध्ये भरावं लागणार आहे.

रेशन कार्ड ट्रान्सफर साठी लागणारी कागदपत्रं

सरकार / सार्वजनिक सेक्टरमधील उपक्रमांद्वारे जारी ओळखपत्र जे पत्त्यासाठी ग्राह्य मानलं जातं.

टेलिफोन बिल

एलपीजी गॅस पावती

ड्राइव्हिंग लायसन्स

पासपोर्ट

मतदान ओळखपत्र

स्वतःचे घर असल्यास टॅक्स पावती

भाड्याचे घर असेल तर भाडे दिलेली पावती. पावतीवर घराच्या मालकाचे नाव व पूर्ण पत्ता असणं आवश्यक आहे.

यासोबतच तुमच्या सोबत 3 पासपोर्ट साईज फोटो सोबत असणं आवश्यक आहे.

तुम्ही जुनं रेशन कार्ड जमा केल्यानंतरच नवीन कार्ड साठी अर्ज करू शकाल. नव्या BPL रेशन कार्ड साठी 5 रूपये, APL साठी 10 रूपये तर कम्युटरराईज्ड कार्ड साठी 45 रूपये फी घेतली जाईल. वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत आता केंद्र सरकारच्या सवलती सर्वत्र समान मिळणार आहेत.