शासकीय विभागात विविध पदांसाठी नोकरीची संधी, अशा पद्धतीने करा अर्जाची नोंदणी
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण अलाहाबाद बँकेसह विविध विभागात तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. तसेच देशातील विविध ठिकाणी असलेल्या अलाहाबाद बँकेसाठी नोकरीची संधी तरुणांना आजमवता येणार आहे.

तर जाणून घेऊया अर्ज प्रक्रिया, वेळ, शैक्षणिक पात्रता आणि लागू करण्यात आलेल्या अटी-नियम. अलाहाबाद बँकेने 92 रिक्त पदांसाठी भरतीसाठी सूचना जाहीर केली आहे. तर या अर्जाची शेवटची तारीख 29 एप्रिल आहे. इच्छुक तरुणांना अर्ज भरावयास असल्यास त्यांनी बँकेचे अधिकृत संकेतस्थळ allahabadbank.in येथे अधिक माहिती पाहा.

उत्तर प्रदेश लोक सेवा आयोग (UPPSC) यांनी सुद्धा कंप्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रॅम यासाठी 16 रिक्त पदांसाठी भरती करणार आहेत. तर आज यासाठी शेवटची तारीख आहे. अधिकृत संकेतस्थळ: http://uppsc.up.nic.in/ (ATM Fraud: पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 61 खातेदारांची ATM च्या माध्यमातून फसवणूक; असे ठेवा आपले पैसे सुरक्षित)

भारतीय सेनेत नोकरी भरतीमध्ये जनरल ड्युटी, क्लर्क पदांसाठी अर्ज भरु शकता. यासाठी 12 वी पास आणि 18 वर्ष पूर्ण तरुणांचा नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते.

यूनियन पब्लिक सर्विस कमिशन म्हणजेच यूपीएससी यांनी सेंट्रल आर्म्ड पोलिस फोर्ससाठी असिस्टेंट कमान्डेंटच्या 398 पदांसाठी भरती करणार आहेत.