Google Flights वापरुन स्वस्तात मिळवा फ्लाईट तिकीट, घ्या जाणून
Flights | Representational image (Photo Credits: pxhere)

Google Flights फिचर वापरुन आफण आता स्वस्तात स्वस्त फ्लाईट मिळवू शकता. होय. गूगलने नुकतेच एक फिचर लॉन्च केले आहे. जे तुम्हाला तारखेच्या दोन महिने आधी ट्रिप बुक करण्यासाठी सर्वोत्तम वेळ सुचवू शकते. इतकेच नव्हे तर तुम्हाला ते वेगवेगळे पर्यायही सूचवेल. हे पर्याय पाहून तिकीट बुक करायचे आणि प्रवास सुरु करायचे की चांगल्या व्यवहारासाठी आणखी काही काळ वाट पाहायची हे तुम्हालाच ठरवावे लागेल. गुगलने दिलेल्या माहितीनुसार या नव्या फिचर्सचा उद्देश लोकांना स्वस्तामध्ये विमान प्रवास करता यावा आणि विमानांचे नवनवीन बुकिंग ट्रेड्स अपडेट्स मिळवून देणे हा आहे.

Google ने ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, तुम्हाला अधिक विश्वसनीय ट्रेड डेटा आणि तुमच्या प्रवासाच्या तारखा तसेच तुमचे प्रवासाचे अंतिम ठिकाण यानुसार कमीत कमी दर याबातब हे फीचर माहिती देईल. Google Flights तुम्हाला अगदी स्वस्तात स्वस्त दर उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करेन.

Google Flights वर, त्याच मार्गाच्या सरासरीच्या तुलनेत तुमच्या प्रवास मार्गावरील विमान दर सरासरी आहेत की कमि अधीक हे तुम्हाला पाहता येईल. शिवाय ते खिशाला परवडणार आहेत किंवा महाग आहेत का ते तुम्ही आधीच पाहू शकता. तुम्हाला काही फ्लाईट्सच्या सर्चवर विविध रंगांचे बॅज दिसती. ज्याचे भाडे प्रस्तानापूर्वी कमी असणार नाही. मात्र, त्यापैकी एक विमान निवडून तुम्ही टेक ऑफपूर्वी दर कमी झाल्यास त्याचा लाभ घेऊ शकता. तुम्ही यापैकी एक फ्लाइट बुक करता तेव्हा, आम्ही त्याचे निरीक्षण करू टेकऑफच्या पूर्वी किंमत कमी झाल्यास, आम्ही तुम्हाला Google Pay द्वारे अतिरीक्त आलेली रक्कम परत करू, असेही गूगलने म्हटले आहे.

दरम्यान, Google च्या मते, डिसेंबरच्या मध्यापासून सुरू होणाऱ्या सहलींसाठी, तुम्हाला ऑक्टोबरच्या सुरुवातीला अधिक चांगले डील मिळण्याची शक्यता आहे. प्रस्थानाच्या 71 दिवस आधी सरासरी किमती सर्वात कमी असतात. आमच्या 2022 च्या इनसाइट्समधील एक मोठा बदल पाहता ज्यामध्ये असे आढळून आले की प्रस्थानाच्या फक्त 22 दिवस आधी सरासरी किमती सर्वात कमी होत्या.