LPG cylinder (PC - wikimedia commons)

पेटीएम (Paytm) वरून एलपीजी सिलिंडर (LPG Cylinder) बुक करणार्‍या नवीन वापरकर्त्यांसाठी पेटीएमने एक हटके डील आणली आहे. दैनंदिन व्यवहारासाठी मोठ्या संख्येने भारतीय या अॅप्लिकेशनचा वापर करतात. एलपीजी सिलेंडर सहज बुक (LPG Cylinder Booking) करण्यासाठी अनेक लोक पेटीएमचा वापर करतात. तुम्ही पेटीएमद्वारे एलपीजी सिलिंडर मोफत बुक करू शकता. यासाठी तुम्हाला खालील स्टेपचा अवलंब करावा लागेल.

तुम्हाला मोफत LPG सिलिंडर कसा मिळवायचा हे जाणून घ्यायचे असेल, तर येथे प्रक्रिया जाणून घ्या- (वाचा - Digital Currency: भारतीय डिजिटल चलन कधी येणार? सरकारी सूत्राने दिली 'ही' माहिती)

  • तुमचा मोफत एलपीजी गॅस सिलिंडर बुक करण्यापूर्वी तुम्ही नियम आणि अटी वाचल्याची खात्री करा.
  • ऑफरचा लाभ घेण्यासाठी, पेटीएम अॅपवर पेमेंट प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी तुम्हाला 'फ्रीगॅस' कूपन कोड वापरण्याची आवश्यकता आहे.
  • कंपनीने अलीकडे सिंगल सिलेंडर बुकिंगमध्ये सुधारणा केली आहे.
  • हे वापरकर्त्यांना त्यांच्या गॅस सिलिंडरच्या बुकिंगचा मागोवा घेण्यास आणि रिफिल मिळविण्यास सक्षम करते.
  • पेटीएमचे म्हणणे आहे की, नवीन वापरकर्ते त्यांच्या पहिल्या बुकिंगवर 30 रुपयांचा फ्लॅट कॅशबॅक मिळवू शकतात. हा लाभ घेण्यासाठी, वापरकर्त्यांनी पेटीएम अॅपवर पेमेंट पूर्ण करताना प्रोमोकोड “FIRSTCYLINDER” लागू करणे आवश्यक आहे.
  • ही कॅशबॅक ऑफर सर्व 3 प्रमुख एलपीजी कंपन्यांकडून सिलिंडर बुकिंगवर लागू आहे – इंडेन, एचपी गॅस आणि भारत गॅस.
  • वापरकर्ते पेटीएम पोस्टपेड 'पेटीएम नाउ पे लेटर’ प्रोग्राममध्ये नोंदणी करू शकतात आणि पुढील महिन्यात सिलिंडर बुकिंगसाठी पैसे देऊ शकतात.

मोफत गॅस सिलिंडर कसा बुक करायचा?

  • 'बुक गॅस सिलेंडर' टॅबवर जा.
  • गॅस प्रदाता निवडा.
  • तुमचा मोबाईल नंबर/एलपीजी आयडी/ग्राहक क्रमांक टाका
  • तुमच्या पसंतीच्या मोडनुसार पेमेंट पूर्ण करा.
  • जवळची गॅस एजन्सी नोंदणीकृत पत्त्यावर सिलिंडर वितरित करेल.

दरम्यान, 1 फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होण्याच्या काही वेळापूर्वीच एलपीजी गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले होते. तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात केली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने जारी केलेल्या सुधारित दरांनुसार, आता 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर आता 91.5 रुपयांच्या घटलेल्या किमतीसह उपलब्ध होणार आहे. नवीन दर लागू झाल्यानंतर व्यावसायिकांना सिलिंडर आता 1,907 रुपयांना मिळणार आहे.