PM Kisan Samman Nidhi Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता - रिपोर्ट
Farmers | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

PM Kisan Samman Nidhi Yojana: 1 फेब्रुवारी रोजी संसदेत जाहीर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. झी बिझनेसमधील वृत्तानुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवू शकतात. अहवालानुसार, ही रक्कम 6,000 रुपयांवरून 8,000 रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते आणि प्रत्येकी 2,000 रुपयांच्या चार हप्त्यांमध्ये विभागली जाण्याची शक्यता आहे. सध्या पीएम किसान सन्मानाची रक्कम दर 4 महिन्यांनी जारी केली जाते.

शेतकरी तेराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत -

सध्या केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 13वा हप्ता लवकरच जारी करेल. याची शेतकरी वाट पाहत आहेत. योजनेचा एक भाग म्हणून, सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना तीन समान हप्त्यांमध्ये प्रतिवर्षी 6,000 रुपयांचे उत्पन्न समर्थन प्रदान केले जाते. संपूर्ण मदत थेट या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाते. अहवालानुसार, 13 वा हप्ता जानेवारीच्या अखेरीस येण्याची शक्यता आहे. परंतु अद्याप निश्चित तारीख जाहीर केलेली नाही. (हेही वाचा - 7th Pay Commission: खुशखबर! एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना यावर्षी मिळू शकतात 3 भेटवस्तू)

13 कोटी शेतकरी कुटुंबांना मिळणार 13व्या हप्त्याचा लाभ -

PM किसान सन्मान निधी योजनेच्या 13 व्या हप्त्याचे एकूण 13 कोटी शेतकरी कुटुंबे लाभार्थी असतील. तसेच, हे लाभ घेण्यासाठी शेतकरी कुटुंबांना काही निकष पूर्ण करावे लागतील. अहवालात म्हटल्याप्रमाणे. ई-केवायसी निकष आणि इतर निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळेल.

केंद्र सरकारनेही गेल्या वर्षी उत्पन्न समर्थन 6,000 रुपयांवरून 8,000 रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या 5 राज्यांतील निवडणुका लक्षात घेऊन त्या वेळी सरकारने या निर्णयाचा विचार केला होता.

विशेष म्हणजे, पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पैसे वाढवण्याव्यतिरिक्त, अर्थमंत्री निर्मला सीतारामन सर्व पिकांसाठी एमएसपी (किमान समर्थन मूल्य) वर पॅनेल स्थापन करण्याची घोषणा देखील करतील अशी अपेक्षा होती. अनेकांनी हे पाऊल आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा आरोप केला होता.