Gas Cylinder Booking Paytm Offer | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

तुम्ही जर तुमचा घरगुती गॅस सिलिंडर बुक (LPG Gas Cylinder) करुन 500 रुपयांची बचत करु शकता. त्यासाठी पेटीएम आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर घेऊन आले आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार पेटीएम द्वारे गॅस सिलिंडर (Gas Cylinder ) बुक केल्यास ग्राहकांना 500 रुपयांपर्यंत कॅशबॅक देणार आहे. Paytm Offer नुसार आपण कोणताही गॅस बुक केला तरीही आपल्याला ही ऑफर लागू होणार आहे. त्यासाठी HP, Bharat Gas, Indane, Bharat Petroleum यापैकी कोणताही कंपनीच्या गॅस सिलिंडर बुकींग चालमार आहे. काय आहे पेटीएम गॅस सिलिंडर बुकींग ऑफर (Gas Cylinder Booking Paytm Offer) घ्या जाणून.

कॅशबॅक मिळविण्यासाठी असे करा Gas Cylinder Booking

गॅस बुक करण्यासाठी आपल्याला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि स्मार्टफोनची आवश्यकता आहे. आपल्या स्मार्टफोनमध्ये (Smartphone) पेटीएम अॅप ( (Paytm App)) डाऊनलोड करा. डाऊनलोड झालेले अॅप ओपन करा. अॅप ओपन केल्यावर स्क्रीनवर जर कोणताच पर्याय (ऑप्शन) दिसला नाही तर Show More ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला Recharge and Pay Bills हा ऑप्शन दिसू लागेल. या ऑप्शनवर क्लिक करा. आपल्याला अनेक पर्याय उपलब्ध होतील. यात आपल्याला Book a Cylinder असाही ऑप्शन दिसेल. बूक सिलिंडर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला गॅस प्रोव्हायरड (तुमचा नियमीत गॅस पुरवठादार) निवडावा लागेन. जसे की भारत गॅस (Bharat Gas), इंडियन (Indane Gas) वैगेरे.

गॅस प्रोव्हायडर निवडल्यानंतर गॅस एजन्सीमध्ये दिलेला रजिस्टर मोबाईल क्रमांक किंवा एलपीजी आयडी टाका. जसेही आपण डिटेल्स टाकून Proceed ऑप्शनवर क्लिक कराल तसे आपल्या समोर एलपीजी आयडी, ग्राहक क्रमांक आणि एजन्सीचे नाव येईल. खाली सिलिंडरसाठी आकरण्यात येणारी रक्कम दिसू लागेल. (हेही वाचा, Dhanteras 2020: Paytm, GooglePay आणि Broker Firms च्या माध्यमातून कशी कराल डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक? जाणून घ्या)

लक्षात ठेवा की, Paytm द्वारे गॅस सिलिंडर बुकींग केल्यानंतर ग्राहकांना 500 रुपयांपर्यंत कॅशबॅक दिला जात आहे. वाचक आणि ग्राहकांच्या माहितीसाठी असे की, Paytm Offer चा लाभ ग्राहकांना एकवेळच घेता येणार आहे. या ऑफरचा लाभ त्याच ग्राहकांना घेता येणार आहे ज्यांची सिलिंडर बुक केल्याची रक्कम कमीत कमी 500 रुपये आहे.

प्राप्त माहितीनुसार Paytm Offer केवळ 31 डिसेंबर पर्यंतच वैध असणार आहे. Paytm Gas Booking Promocode चा FIRSTLPG प्रोमोकोड प्रोमोकोड सेक्शनमध्ये टाकायचा आहे. या प्रोमोकोडवर 5000 रुपयांपर्यंत कॅशबॅक दिला जाणार आहे. लक्षात ठेवा जर आपण प्रोमोकोड टाकायला विसरलात तर आपल्याला कॅशबॅक मिळणार नाही. लक्षात ठेवा की प्रोमोकोड पेटीएमच्या माध्यमातूनच पहिले गॅस बुकिंग करायचे आहे.