Coronavirus Outbreak: Lockdown च्या काळात स्टेट बँक ऑफ इंडिया घरबसल्या देणार 'या' सुविधा
State Bank of India (SBI) | (Photo Credits: PTI/File)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारत देश 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला आहे. या काळात जीवनावश्यक वस्तूंसह आर्थिक व्यवहारांसाठी बँका सुरु राहणार आहेत. दरम्यान गर्दी टाळण्यासाठी बँकांच्या डिजिटल सेवांचा वापर करावा, असे सर्वच बँकांकडून आवाहन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी नवी सुविधा सुरु केली आहे. याद्वारे ग्राहकांना घरबसल्या बँक व्यवहारांची माहिती मिळणार आहे. यासाठी बँकेकडून आयव्हीआर (IVR) सेवा सुरु करण्यात आली आहे. याद्वारे तुम्हाला खात्यातील बॅलन्स आणि शेवटचे पाच ट्रान्झॅक्शनची याची माहिती मिळेल.

लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडता येणार नसले तरी घरबसल्या तुम्ही बँकेने उपलब्ध करुन दिलेल्या सेवाचा लाभ नक्कीच घेऊ शकता. (SBI ने सुरु केली DoorStep Banking ची सुविधा; आता घरबसल्या करा बँकेची कामे)

या सेवेचा लाभ कसा घ्याल?

# सर्वप्रथम ग्राहक केंद्राच्या 1800-425-3800 किंवा 1800-11-2211 या नंबरवर फोन करा.

# त्यानंतर भाषा निवडा.

# रजिस्टर्ड बेस्ड नंबरच्या सेवेसाठी 1 डायल करा.

# अखेरचे पाच ट्रान्झॅक्शनसाठी पुन्हा 1 डायल करा.

# त्यानंतर आयव्हीआरच्या माध्यमातून माहिती घेण्यासाठी 1 आणि एसएमएसद्वारे माहिती घेण्यासाठी 2 दाबा.

# ही सुविधा बचत खाते धारकांसाठी असून तुमचा मोबाईल क्रमांक एकाच रजिस्टर असणं अनिवार्य आहे.

यापूर्वी स्टेट बँकेने DoorStep Banking ची सुविधा सुरु केली होती. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांसाठी असलेल्या या सुविधेचं शुल्क 100 रुपये आहे. याशिवाय एचडीएफसी, कोटक, एक्सिस आणि इतर बँकांकडून घरपोच पैसे पाठवण्याची सोय उपलब्ध करुन दिली जात आहे. या सेवेची माहिती संबंधित बँकेच्या संकेतस्थळावर किंवा अॅपवर उपलब्ध आहे.