7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीनंतर मिळू शकते डबल गिफ्ट, जाणून घ्या सविस्तर
Money प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा आता जवळपास संपली आहे. सरकार आता त्यांचा महागाई भत्ता (DA) देणार आहे. केंद्र सरकारच्या एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आता दुहेरी भेट मिळणार आहे. जानेवारी 2022 चा महागाई भत्ता (Dearness Allowance) मार्चमध्ये जाहीर केला जाईल. होळीनंतर नोकरदारांना मोठी भेट मिळू शकते. यासोबतच जानेवारी आणि फेब्रुवारीची थकबाकीही मिळू शकते.

झी बिझनेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, जेसीएम सचिव शिव गोपाल मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, औद्योगिक कामगारांच्या महागाईच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे की, जानेवारी 2022 मध्ये 3 टक्के डीए वाढणार आहे. मार्चमध्ये होळीनंतर त्याचीही घोषणा केली जाईल आणि पैसे भरण्याची प्रक्रियाही सुरू होईल. आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. (वाचा - 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचार्‍यांच्या DA मध्ये 14 टक्क्यांच्या वाढीची घोषणा; 18 महिन्यांची थकबाकी एकरकमी मिळणार का? जाणून घ्या सविस्तर)

डीएमध्ये 34 टक्क्यांची वाढ -

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 31 टक्के डीए मिळत आहे. पण, पुढचा हप्ता जोडून तो आता 34 टक्के होईल. जानेवारी 2022 मध्ये डीए 3 टक्क्यांनी वाढणार आहे. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत (7th Pay Commission) जानेवारी 2022 मध्ये महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढणार आहे. अशा परिस्थितीत एकूण डीए 34 टक्के वाढेल. 34 टक्के रक्कम मार्च महिन्याच्या पगारासह दिली जाईल.

दरम्यान, डिसेंबर 2021 साठी AICPI-IW (औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक) डेटा जारी करण्यात आला आहे. डिसेंबरमध्ये तो 0.3 अंकांनी घसरून 125.4 अंकांवर आला. नोव्हेंबरमध्ये हा आकडा 125.7 अंकांवर होता. त्यात 0.24% ने घट झाली आहे. परंतु, याचा महागाई भत्त्यावरील वाढीवर परिणाम झालेला नाही. कामगार मंत्रालयाच्या AICPI IW च्या आकडेवारीनंतर, यावेळी महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.