Bank Holiday | Representational Image (Photo Credits: PTI)

Bank Holidays in April 2021: एप्रिल महिन्याची सुरुवातच सुट्ट्यांपासून होत आहे. तर एप्रिल 2021 मध्ये 'या' काही दिवशी बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे जर तुमची काही महत्वाची कामे असल्यास ती लवकर उरकून घ्या. कारण 31 मार्च 2021 ला आर्थिक वर्ष संपणार आहे. त्यामुळे आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस असल्याने ग्राहकांसंबंधित कामकाज 31 मार्च आणि 1 एप्रिल दरम्यान होऊ शकत नाही. अशातच जर तुम्ही बँकेसंबंधित काही काम करायचे ठरवले असल्यास आधी बँक हॉलिडे बद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

आरबीआयच्या बेवसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात विविध ठिकाणच्या बँका 15 दिवस बंद राहणार आहेत. यामध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचा समावेश आहे. तर जाणून घ्या एप्रिल महिन्यात कोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहेत.(Bank Holidays in Year 2021: नववर्षात किती मिळणार सुट्ट्या आणि Long Weekends; येथे पहा संपूर्ण यादी)

>1 एप्रिल- गुरुवार- ओडिशा डे/बँकेचे वर्षभराचे अकाउंट्स बंद केले जाणार आहेत.

>2 एप्रिल- शुक्रवार- गुड फ्रायडे

>4 एप्रिल-रविवार-ईस्टर

>5 एप्रिल-सोमवार-बाबू जगजीवन राम जयंती

>6 एप्रिल-मंगळवार तमिळनाडू मध्ये विधानसभा निवडणूक

>10 एप्रिल- दुसरा शनिवार

>11 एप्रिल-रविवार

>13 एप्रिल-मंगळवार- उगाडी, तेलगू नवं वर्ष, बिजू सण

>14 एप्रिल- बुधवार- डॉक्टर आंबेडकर जयंती

>15 एप्रिल-गुरुवार-हिमाचल डे, विशु, बंगाली नवं वर्ष

>16 एप्रिल- शुक्रवार- बोहाग बिहू

>18 एप्रिल-रविवार

>21 एप्रिल- मंगळवार- राम नवमी

>24 एप्रिल- चौथा शनिवार

>25 एप्रिल-रविवार-महावीर जयंती

तर तेगलू नवं वर्ष, बिहू, गुढी पाडवा , बिजू सण आणि उगाडी च्या दिवशी 13 एप्रिलला बँकांना सुट्टी असणार आहेत. त्यानंतर पुढील दिवशी म्हणजेच 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. तर 15 एप्रिलला हिमाचल डे, विशू, बंगली न्यू ईअर, सरहुलच्या काही राज्यांमध्ये सुट्टी असणार आहे. त्यानंतर 21 एप्रिलला रामनवमी आणि 25 एप्रिलला महावीर जयंती असल्याने बँक बंद राहणार आहेत.  त्याचसोबत बँका 10 आणि 24 एप्रिलला दुसरा आणि चौथा शनिवार असल्याने सुट्टी असणार आहे. या व्यतिरिक्त 4,11 आणि 18 एप्रिलला रविवार आहे.