Aadhaar-PAN Card Linking Deadline: आधार -पॅन कार्ड जोडणीची अंतिम मुदत 30 जून; तुमच्या कार्ड्सची स्टेटस इथे पहा ऑनलाईन
Aadhaar-Pan | (Photo Credits: Archived, edited)

आधार कार्ड (Aadhaar Card) आणि पॅन कार्ड (PAN Card) जोडणीची अंतिम मुदत आता अवघ्या काही तासांमध्ये संपणार आहे. करदात्यांना काही महिन्यांची मुदतवाढ देत अखेर 30 जून पर्यंत आधार कार्ड पॅन कार्ड सोबत जोडण्याचं आवाहन करण्यात आले आहे. काही सेवांकरिता आधार कार्डला पॅन कार्ड जोडणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आले आहे. दरम्यान जोपर्यंत ग्राहक आधार कार्डला पॅन कार्ड जोडलं जात नाही तोपर्यंत नागरिकांना त्यांचे आयटीआर देखील सादर करता येणार नाहीत.

मागील काही वर्षांत अनेकदा आधार-पॅन जोडणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. मग आता तुमचं आधार-पॅन जोडलेलं आहे की नाही? हेच तुम्हांला आठवत नसेल तर ऑनलाईन त्याचं स्टेटस जाणून घेण्याची देखील सोय आहे.

आधार-पॅन जोडणीचं पहा स्टेटस ऑनलाईन

  • Income Tax e-filing website वर जाऊन Aadhaar status पहा.
  • आता तुमचा पॅन नंबर आणि आधार नंबर टाका.
  • 'View Link Aadhaar Status' वर क्लिक करा.
  • तुमची कार्ड्स जोडलेली आहेत की नाहीत त्याचा मेसेज दिसेल.जर तुम्ही कार्ड जोडलेली नसतील तर official e-filing website ला भेट द्या. आता ही कार्ड जोडणीची प्रक्रिया सशुल्क करण्यात आली आहे. यासाठी एक हजार रूपये मोजावे लागणार आहेत.

PAN-Aadhaar Linking: पॅन कार्डसोबत आधार क्रमांक लिंक करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; जाणून घ्या याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया.

Income-tax Act, 1961 नुसार, सर्व पॅनकार्ड धारकांना, ज्यांना सूट देण्यात आली आहे त्यांना वगळून, त्यांचं पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे. काही युजर्सना अलीकडेच दोन कार्डांमधील नाव, जन्मतारीख, लिंग इत्यादीमधील फरक यासारख्या विसंगतीमुळे त्यांचे पॅन आणि आधार लिंक करण्यात अडचणी आल्या आहेत. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, प्राप्तिकर विभागाने एक उपाय दिला आहे. युजर्स PAN केंद्रांना भेट देऊ शकतात जिथे बायोमेट्रिक-आधारित प्रमाणीकरणाचा उपयोग विसंगतीमुळे आलेल्या त्रृटी दूर करता येऊ शकतात.