केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या (Diwali) निमित्ताने गोड भेट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच केंद्र सरकारच्या (Central Government) 8,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना पदोन्नती (Promotion) देण्याची योजना आखत असल्याची चर्चा होती. पदोन्नतीचा अजुन मुहूर्त लागला नसला तरी सणासुदीच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे. या नवरात्रीला (Navratri) केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना 4 टक्के वाढीव डीए (DA) लागू केल्यास एकूण महागाई भत्ता 38 टक्क्यांवर जाईल. तरी या वाढीव भत्त्याबाबत केंद्र सरकार (Central Government Employee) कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. अखिल भारतीय CPI-IW ने या महिन्यात DA मध्ये वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच महागाई भत्त्याच्या वाढीसोबतच कर्मचाऱ्यांना जुलै (July) आणि ऑगस्ट (August) महिन्याची थकबाकीही मिळण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारच्या (Central Government) कर्मचाऱ्यांच्या वर्षात दोनदा वाढीव महागाई भत्ता (DA) दिला जातो. पहिला जानेवारी (January) ते जून (June) तर दुसरा जुलै (July) ते डिसेंबर (December) या कालावधीत दिला जातो. केंद्रीय मंत्रिमंडळाने (Central Government) 30 मार्च रोजी महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) 3 टक्क्यांनी वाढवून 34 टक्क्यांनी महागाईची भरपाई केली होती. ज्यामुळे 1.16 कोटी केंद्र सरकारी कर्मचारी (Central Government Employee) आणि पेन्शनधारकांना (Pension) फायदा झाला होता. तर यावेळी महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केल्याच कर्मचाऱ्यांना 38 टक्के भत्त्याचा लाभ होईल. (हे ही वाचा:- FD Rates Hikes: आता 'या' सरकारी बँकेच्या ग्राहकांना मिळणार अधिक परतावा; बँकेने वाढवले एफडी दर)
तसेच केंद्र सरकारच्या (Central Government) काही पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती (Promotion) मिळण्याची चर्चा आहे. तरी या पदोन्नती होणं ऑगस्ट (August) महिन्यात अपेक्षित होत आता ऑक्टोबरच्या (October) उंबरठ्यावर पोहचून देखील केंद्र सरकारडून या बाबतची कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी पदोन्नतीची प्रक्रिया जलद करण्याचे आश्वासन दिले होते. तरी अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीपूर्वी प्रशिक्षणाचे कारण देत या पदोन्नती पुढे ढकल्याचं बोल्ल्या जातं. यापूर्वी जुलै महिन्यात काही कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्या होत्या तरी वाढीव महागी भत्ता ही सरकारकडून विशेष भेटचं म्हणता येईल.