Indian Army मार्फत मिलिटरी नर्सिंग कोर्स पदांच्या 220 जागांसाठी भरती
(Photo credit: archived, edited, representative image)

बातमी Indian Army मधील नोकर भरती विषयी. भारतीय सैन्य दलात महिलांसाठी एका विशिष्ट पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. भारतीय सैन्यमार्फत मिलिटरी नर्सिंग कोर्स पदांच्या 220 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 2 डिसेंबर 2019 आहे. या महिलांसाठी सुवर्णसंधी असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करावा असेही त्यांनी म्हटले आहे.

या मिलिटरी नर्सिंग कोर्ससाठी 220 जागा राखीव ठेवण्यात आल्या असून महिलांसाठी भारतीय सैन्य दलात एका महत्वपुर्ण पदासाठी काम करण्याची ही चांगली संधी आहे असे म्हणायला हरकत नाही. यासाठी 1 ऑक्टोबर 1995 ते 30 सप्टेंबर 2003 दरम्यान जन्मलेल्या उमेदवारच हा अर्ज भरण्यास पात्र असतील. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 750 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले आहे. सविस्तर माहितीसाठी तुम्ही www.indianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

शैक्षणिक पात्रता:

वरिष्ठ माध्यमिक परीक्षा (12वी) किंवा समकक्ष भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजीसह उत्तीर्ण. 50% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

हेदेखील वाचा- खुशखबर! रेल्वेत 10 वी पास युवकांसाठी सरकारी नोकरीची संधी; जाणून घ्या कुठे कराल अर्ज आणि महत्वाच्या तारखा

ठिकाण:

नवी दिल्ली, पुणे, मुंबई, कोलकात, लखनऊ, बेंगळुरू

कसे अर्ज भराल?

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. 14 नोव्हेंबर 2019 ते 2 डिसेंबर 2019 दरम्यान या संकेतस्थळावर तुम्हाला हा अर्ज भरता येईल.

दक्षिण मध्य रेल्वेनेही (एससीआर) प्रशिक्षु (अप्रेंटिस) पदाच्या रिक्त जागांसाठी नोकर भरती सुरु केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 डिसेंबर आहे. या भरती परीक्षेच्या माध्यमातून एकूण 4,103 पदे भरली जाणार आहेत.