जर आपण बराच काळ सरकारी नोकरीच्या (Government job) शोधात असाल, आणि आपल्याला अद्याप नोकरी मिळाली नसेल, व आपण रेल्वेत काम करण्यास इच्छुक असाल तर आपल्यासाठी ही महत्वाची बातमी असू शकते. दक्षिण मध्य रेल्वेने (एससीआर) प्रशिक्षु (अप्रेंटिस) पदाच्या रिक्त जागांसाठी नोकर भरती सुरु केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 डिसेंबर आहे. या भरती परीक्षेच्या माध्यमातून एकूण 4,103 पदे भरली जाणार आहेत.
वय:
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 15 वर्षे असावे. त्याच वेळी, कमाल वय 24 वर्षे आहे. तसेच अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत पाच वर्षांची सवलत देण्यात येणार आहे.
अर्ज फी:
अनुसूचित जाती/जमाती/महिला/पीडब्ल्यूडी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही.
इतर सर्व उमेदवारांना 100 रुपये फी भरावी लागेल.
निवड प्रक्रिया:
गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
शैक्षणिक पात्रता:
उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या पदांनुसार विहित केलेल्या इतर पात्रतांविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरुन सूचना डाऊनलोड करुन वाचा. (हेही वाचा: 12 वी उत्तीर्ण तरुणांसाठी आनंदाची बातमी; नौदलात मिळणार नोकरीची संधी)
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज सादर करण्याची प्रारंभ तारीख: 09 नोव्हेंबर, 2019
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीखः 08 डिसेंबर 2019 (रात्री 23:30 पर्यंत)