Indian Navy Recruitment 2019 | Representational Image | (Photo Credits: IANS)

भारतीय नौदलात कार्यालयीन कामकाज करण्यासाठी 12 वी उत्तीर्ण झालेल्या तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी भारतीय नौदलात तब्बल 2 हजार 700 पदांसाठी मोठी भरती करण्यात येणार आहे. ऑगस्ट 2020 च्या तुकडीसाठी ही भरती प्रक्रिया राबण्यात येणार आहे. नौदलातील जवानांना विविध वस्तू पुरविण्यासह कार्यालयीन कामाकाजासाठी ही पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुकांना 18 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे, ज्या उमेदवारांची निवड केली जाईल, त्यांना नौदलाच्या देशभरातील कार्यलयांमध्ये नियुक्त केले जाणार आहे.

तरुणांना नोकरी मिळवण्याकरीता भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाईटवर संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. भारतीय नौदलाच्या अर्टिफिशिअल अॅप्रेंटिस विभागात 500, वरिष्ठ माध्यमिक भरती विभागात 2 हजार 200 पदे भरण्यात येणार आहे. त्याचबरोबर अर्टिफिशिअल विभागात 20, तर वरिष्ठ माध्यमिक भरती विभागात 15 वर्षासाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. हे देखील वाचा- Maharashtra Police Bharti 2019: महाराष्ट्र राज्यभर पोलिस शिपाई भरती 2019 ला आजपासून सुरूवात; mahapariksha.gov.in वर करा अर्ज

भारतीय नौदलाकडून यासाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवाराला अर्ज भरण्यासाठी 14 हजार 600 रुपये भत्ते द्यावे लागणार आहे. भारतीय नौदलाकडून https://www.joinindiannavy.gov.in/ या संकेत स्थळावर संपूर्ण माहिती पुरवण्यात आली आहे. उमेदवाराला कोणतीही शंका असेल तर याची माहिती मिळवण्यासाठी या वेबसाईटला भेट द्या, असे आवाहन भारतीय नौदलाकडून करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, येत्या फेब्रुवारी महिन्यात ही परिक्षा घेण्यात येणार आहे.