प्रतिकात्मक फोटो (File Photo)

सरकारी खात्यात विविध पदांकरिता नोकरभरती निघत आहे. त्यात आता सीमा सुरक्षा दलात ( BSF) कॉन्स्टेबल (जीडी) पदांच्या 1356 जागांसाठी भरती प्रक्रिया निघणार आहे. 7 नोव्हेंबर 2019 पासून 14 नोव्हेंबर 2019 पर्यंत याकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. या तारखेदरम्यान ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता www.bsf.nic. in हा त्यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. BSF दलातील ही मोठी भरती असल्याचे कळते. इतकेच नव्हे तर पात्र उमेदवारांना 21,700 ते 69,100 रुपये इतकी वेतनश्रेणी मिळणार आहे.

सीमा सुरक्षा दल (बी.एस.एफ.) भारताच्या केंद्रिय सशस्त्र पोलीस दलाचा भाग आहे. सीमा सुरक्षा दल शांतिकालात गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार भारताच्या जमिनीवरील सीमांचे रक्षण करते. अशा या महत्वपूर्ण विभागाच्या कॉन्स्टेबल पदाकरिता ही मोठी भरती निघाली आहे.

या पदासाठी मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून मॅट्रिक किंवा दहावी पास अशी शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे आहे. तर शारीरिक पात्रतेसाठी पुरुष/स्त्रियांसाठी पुढील अट ठेवण्यात आली आहे.

1. पुरुष:

उंची- 168 सेमी

छाती- 78 सेमी

2. महिला:

उंची-155 सेमी

वयाची अट:

1 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 23 वर्षे पुर्ण

(SC/ST- 05 वर्षे सूट, OBC-03 वर्षे सूट)

वेतनश्रेणी: 21,700 रुपये ते 69,100 रुपये

नोकरीचे ठिकाण: भारतात कुठेही

त्याचबरोबर भारतीय तटरक्षक दलात नाविक पदासाठी भरती आहे. यात निवडक उमेदवारास सातव्या वेतन आयोगानुसार, 21,700 रुपये इतकी वेतनश्रेणी मिळणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही संधी न दवडता लवकरात लवकर या पदासाठी अर्ज करावे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन 30 ऑक्टोबरपासून सुरु झाले असून 8 नोव्हेंबर 2019 ला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भरता येतील. या पदाकरिता उमेदवार हा कमीत कमी 10 वी पास असावा. त्यात त्याला 50% किंवा त्याहून जास्त टक्के असावे. SC आणि ST उमेदवारांसाठी 5% कमी असून त्यांना कमीत कमी 45% असणे अनिवार्य आहे. तसेच खेळ, क्रिडा, राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठीही 45% अट ठेवण्यात आली आहे.