Terrorist Killed in Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला
Encounter | (Photo Credits: Pixabay)

Terrorist Killed in Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) च्या राजौरीमध्ये दुसऱ्या दिवशीही दहशतवादविरोधी कारवाई सुरूच आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी रविवारी दावा केला की कुपवाडा पोलिस आणि लष्कराच्या संयुक्त कारवाईत घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमध्ये नियंत्रण पूर्ववत करण्यात आले असून चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे. काश्मीर झोन पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'एक संयुक्त कारवाईत, लष्कर आणि कुपवाडा पोलिसांनी तंगधार सेक्टरच्या अमरोही भागात नियंत्रण रेषेजवळ एका दहशतवाद्याचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. सर्च ऑपरेशन सुरू आहे.'

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि कुपवाडा पोलिसांनी नियंत्रण रेषेजवळील तंगधारच्या अमरोही भागात संयुक्तपणे कारवाई सुरू केली. या संयुक्त कारवाईदरम्यान एक दहशतवादी मारला गेला आणि घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. (हेही वाचा - Chhattisgarh: प्रियकर प्रेयसी हायटेन्शन टॉवरवर चढले, पोलीस येताच खाली उतरले, पाहा व्हिडिओ)

दरम्यान, राजौरीमध्ये दुसऱ्या दिवशीही दहशतवादविरोधी कारवाई सुरूच आहे. राजौरी जिल्ह्यातील गुंधा-खवास गावात काल चकमक सुरू होताच एक दहशतवादी मारला गेला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, काल चकमक सुरू झाली, त्यादरम्यान एक अज्ञात दहशतवादी मारला गेला. ऑपरेशन अजूनही सुरू आहे.

डिफेन्स पीआरओ 14 कॉर्प्स लेफ्टनंट कर्नल सुनील बारटवाल यांनी एका निवेदनात सांगितले की, त्यांना दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. पलायनाचे सर्व मार्ग रोखण्यासाठी अधिक सुरक्षा दलांना पाचारण करण्यात आले असून दहशतवाद्यांना निष्प्रभ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

गेल्या एका महिन्यापासून उत्तर काश्मीरच्या कुपवाडा आणि पूंछ-राजौरीमध्ये दहशतवाद्याचे घुसखोरीचे प्रयत्न फसले आहेत. एलओसी आणि आयबीवर तैनात लष्कर आणि पोलिसांना आधीच सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये एलओसी आणि आयबीवर आधीच हाय अलर्ट जारी करण्यात आला असून रात्रंदिवस गस्त सुरू ठेवण्यात आली आहे. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी राजौरीतील पोलिसांनी लोकांना चकमकीच्या ठिकाणापासून दूर राहण्यास सांगितले आहे.