प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit- Flickr)

मागच्या वर्षीच्या दुष्काळाच्या झळा आजही शेतकऱ्यांना बसत आहे. अजूनही सरकार दुष्काळग्रस्त भागात विविध योजना राबतच आहे. बघता बघता उन्हाळा उंबरठ्यावर येऊन ठेपला असताना, एक शेतकऱ्यांना दिलासादायक अशी बातमी मिळत आहे. यंदा समाधानकारक पाऊस होणार असल्याचा प्राथमिक अंदाज 'स्कायमेट' (Skymet) या खासगी संस्थेने वर्तवला आहे, त्यामुळे यावर्षी दुष्काळाची छाया पसरणार नाही. स्कायमेटच्या अंदाजानुसार यावर्षी 96 ते 104 टक्के पाऊस पडेल, असे म्हटले आहे. स्कायमेट ही हवामानाचा अंदाज वर्तवणारी एकमेव खासगी संस्था आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये 4518 नव्या गावांचा समावेश, 8 सवलती तात्काळ लागू)

मान्सून समाधानकारक राहण्याची शक्यता ही 50 टक्केपेक्षा जास्त आहे. तसेच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात देशात 96 ते 104 टक्के पाऊस पडेल असे स्कायमेटचे चीफ एक्झक्मियुटिव्ह ऑफिरस जतीन सिंह यांनी सांगितले आहे. मागील वर्षी 2018 मध्ये जुलै-सप्टेंबरपर्यंत मान्सूनच्या अखेरीस पाऊस सरासरी 91 टक्के राहिली. जो हवामान विभागाच्या 97 टक्क्यांच्या अंदाजाच्या तुलनेत कमी होता. गेल्या 5 वर्षांत 2015 मध्ये सर्वाधिक खराब मान्सून राहिला. त्यावेळी 14 टक्के कमी पाऊस झाला.