Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतात (India) दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या (COVID19) संख्येत झपट्याने वाढ होत असताना देशातील नागरिकांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. देशात गेल्या 24 तासात तब्बल 2 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती भारत सरकारने दिली आहे. कोरोना विषाणूने संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन ठेवण्यात आला आहे. तसेच कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागल्याने नागरिकांना तात्पूर्ता दिलासा मिळाला आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र आणि राज्य सरकारकडून खबरदारीचा उपाय म्हणून अनेक उपाय योजना राबवल्या जात आहेत. भारतात आतापर्यंत 96 हजार 169 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 3 हजार 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 36 हजार 824 जणांनी कोरोनावर मात केली आहे. भारत सरकारने दिलेल्या माहितीने देशातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. भारतात गेल्या 24 तासात 2 हजार 715 रुग्ण बरे झाले आहेत. हे देखील वाचा- मुख्यमंत्री BS Yediyurappa यांनी महाराष्ट्र सह 'या' राज्यातून नागरिकांना कर्नाटक मध्ये Lockdown 4 मध्ये प्रवेश रोखला

एएनआयचे ट्वीट-

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.