Karnataka CM BS Yediyurappa (Photo Credits: ANI)

भारतामध्ये आज (18 मे) पासून कोरोना व्हायरस लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. दरम्यान काल केंद्रीय गृह खात्याने संचारबंदीच्या नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देत आता राज्य सरकारला काही गोष्टींबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे.यामध्ये दोन राज्यांमध्ये वाहतूकीला परवानगी देताना दोन्ही राज्यांनी समन्वयाने हा निर्णय घेण्याचं म्हटलं आहे. त्यानुसार आज कर्नाटकामध्ये मुख्यमंत्री BS Yediyurappa यांनी लॉकडाऊन 4 च्या नियमावलीची घोषणा करताना महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडू मधून नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणुन ही बंदी असल्याचं म्हटलं आहे.  दरम्यान लॉकडाऊन 4 मध्ये कर्नाटकात त्यांनी राज्यांतर्गत वाहतूकीला आणि उद्योग धंद्यांना परवानगी दिली आहे.

भारतामध्ये 31 मे पर्यंत चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन असेल. या लॉकडाऊनमध्ये वाहतूकीला महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडू मधून नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे स्थलांतरित मजुरांना 31 मे पर्यंत कर्नाटकात प्रवेश मिळणं कठीण झालं आहे. दरम्यान महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागावर अनेक मजूर, नागरिक अडकल्याचं चित्र मागील काही दिवसांपासून बघायला मिळालं आहे.

ANI Tweet

आज लॉकडाऊन 4 च्या पहिल्याच दिवशी घोषणा करताना त्यांनी रेड झोन वगळता इतर भागात आर्थिक व्यवहारांना मुभा असेल असं म्हटलं आहे. दरम्यान 24 मार्च पासून सुरू असलेला भारतव्यापी लॉकडाऊन आता चौथ्यांदा वाढवण्यात आला आहे. आज 18 मे पासून पुढील 14 दिवस म्हणजे 31 मे पर्यंत भारत लॉकडाऊन असेल. सध्या देशात कोरोनाबाधितांचा आकदा 96 हजारांच्या पार गेला आहे.