
कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगासह भारताला (India) हादरून टाकले आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या भारतातही कोरोनाचे जाळे अधिक वेगाने पसरत असल्याचे चिन्ह दिसू लागले आहेत. भारतात गेल्या 48 तासांत कोरोनाचे एकूण 1 हजार 487 नव्या रुग्णांची आढळून आले आहेत. तर, केवळ 24 तासांत एकूण 896 नव्या रुग्णांची भर पडली असून कोरोनामुळे 37 लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची माहिती दिली आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यातच कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण भारतात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र, कोरोना विषाणूचे जाळे पसरत चालत असल्यामुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 15 लाख 96 हजार 496 वर पोहचली आहे. यांपैकी 95 हजार 505 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 3 लाख 54 हजार 6 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतही आता कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 6 हजार 761 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 199 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 516 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 1380 वर पोहचली आहे. यात 72 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 117 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे. हे देखील वाचा- Coronavirus: संपूर्ण देशात 'भिलवाडा मॉडेल'चे कौतुक; जाणून घ्या इथल्या प्रशासनाने नक्की कसे मिळवले कोरोना विषाणूवर नियंत्रण
एएनआयचे ट्वीट-
In last 48 hours, about 1487 COVID19 cases reported across the country: Ministry of Health and Family Welfare
— ANI (@ANI) April 10, 2020
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.