Election Commission of India: लोकसभा निवडणूक 2024 निकाल 4 जूनला लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयोग आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी किती ठिकाणी फेरमतदान झालं या बाबत माहिती दिली. पत्रकार परिषदेत मिळालेल्या माहितीनुसार, 39 ठिकाणी फेरमतदान झाले. (हेही वाचा- शेअर मार्केट क्रोनोलॉजी वास्तवात? अखिलेश यादव यांनी एग्झिट पोल निकालानंतर केले होते भाकीत)
मिळालेल्या माहितीनुसार, 2019 च्या वेळी 540 फेरमतदान झालं त्याच्या तुलनेत यंदा कमी फेरमतदान झाले आहे अशी माहिती मुख्य निवडणूक आयोग आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये 39 ठिकाणी फेरमतदान झालं. विशेष म्हणजे, 25 फेरमतदान हे दोन राज्यांमध्ये झाले. अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर राज्यात आणि त्यानंतर मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये देखील फेरमतदान झाल्याचा अहवाल आहे. परंतु मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये कमी फेरमतदान झाले आहे.
CEC Rajiv Kumar: In 2019 repolling took place at 540 polling stations. In 2024 the number has come down to only 39, of which 25 were in Arunachal Pradesh and Manipur.@NewIndianXpress
— Mukesh Ranjan (@MukeshRanjan10) June 3, 2024
मुख्य सचिव राजीव कुमार यांनी सांगितले की, ही निवडणूक त्या सार्वत्रिक निवडणुकांपैकी एक आहे ज्यामध्ये आम्ही हिंसाचा पाहिला नाही. यासाठी दोन वर्षाची तयारी करावी लागली. आता मतमोदणीसाठी आम्ही पूर्ण तयारी केली आहे. यावर्षी 64 कोटी नागरिकांनी मतदान केले. यावर्षी 31. 4 कोटी महिला मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला.