Rain Update: गेल्या तीन दिवस देशभरात चांगला पाऊस पडल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला.देशातील काही राज्यात सतत पाऊस असल्याची माहिती मिळत आहे. तर काही राज्यात रिमझीम पाऊस आहे. बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस आहे. राजधानी दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरु आहे. आज हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेशात पावसाची शक्यता आहे.तर काही ठिकाणी सुसाट्याचा वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
पाऊस आल्यामुळे नागरिकांना उष्णेतेपासून सुटका मिळाला आहे. अरबी समुद्रात पश्चिम वाऱ्यामुळे कोकणातील काही भागात पुढील ३ तीन दिवस पावसाची शक्यता दर्शवली आहे. महाराष्ट्रातील मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. २४ तासांत वीजाच्या कडकडाटासह पाऊस असेल. त्यामुळे काही भागांत यलो अलर्ट जारी केला आहे.
दिल्लीत आज हवामान सामान्य राहील, तर काही भागात आज पावसाची शक्यता दर्शवली आहे. १२ ते १६ सप्टेंबरपर्यंत दिल्लीत ढगाळ वातावरण राहण्याताची शक्यता वर्तवली आहे, उत्तर प्रदेशात मुसळधार पावासाने अनेक जिल्ह्यांत पुरस्थिती निर्माण झाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात 12 सप्टेंबरपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.
१२ ते १४ सप्टेंबर पर्यंत मध्यप्रदेश आणि उत्तराखंडातील काही भागात सतत पावसाचा अंदाजा वर्तवला आहे.याशिवाय पुढील चार दिवस उत्तराखंडमध्ये वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने डोंगराळ जिल्हे आणि उधम सिंह नगरच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. हवामान खात्याने छत्तीसगड येथे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.