
देशामध्ये 2016 साली नोटबंदी झाली होती. तेव्हा भारतीय हवाई दलाने देशाच्या विविध भागात 625 टन नोटा पुरवल्या. एका 20 किलोच्या बॅगमध्ये 1 कोटी रुपये बसतात, अशा अनेक बॅगा आम्ही देशभरात पुरवल्या, असे माजी नौदल प्रमुख बी. एस धनोवा (Former IAF Chief Dhanoa) यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. 8 नोव्हेंबरला देशात पंतप्रधान मोदींनी नोटबंदी केली. त्यावेळी 500 आणि हजाराच्या नोटा चलनातून काढून टाकण्यात आल्या.
देशभरामध्ये नव्या नोटा पोहचवण्यासाठी हवाई दलाने 'मिशन 33' राबवले होते. या मिशनच्या माध्यमातून देशभरातील विविध ठिकाणी पैसे पोहचवण्यात आले होते, असंही धनोवा यांनी यावेळी सांगितलं. ते मुंबईतील इंडियन इनस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने आयोजित केलेल्या 'टेकफेस्ट' या कार्यक्रमात बोलत होते. (हेही वाचा - रांची: लोकसभा निवडणुकीत 15 लाख देण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, रामदास आठवले यांच्याविरोधात खटला दाखल)
धनोवा यांनी यावेळी बालाकोट सर्जिकल स्ट्राईक नंतर झालेल्या घडामोडींवरही यावेळी मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी शस्त्रास्त्र खरेदी संदर्भातही भाष्य केलं. शस्त्रास्त्र खरेदीच्या वादांमुळे तसेच दिरंगाईमुळे देशाच्या संरक्षण सज्जतेवर परिणाम होतो. राजीव गांधीच्या काळात बोफोर्स तोफा खरेदी प्रक्रियेवरही आरोप झाले. मात्र, या तोफा भारतासाठी चांगल्या असल्याचे सिद्ध झाले आहे, असं मतही धनोवा यांनी यावेळी मांडले.