हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपींचा एन्काऊंटवर चुकीचा; शशी थरुर, उज्जव निकम, सिताराम येचुरी, मेनका गांधी यांनी व्यक्त केला संताप
Shashi Tharoor, Ujjwal Nikam, Sitaram Yechury, Menka Gandhi (Photo Credit: IANS , Wikimedia, PTI)

हैदराबाद येथील महिला डॉक्टरचा बलात्कार (Hyderabad Rape and Murder Case) करुन हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी चारही आरोपींचा एन्काऊंटर केला आहे. एकीकडे हैदरबाद पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीचे देशभरातून कौतूक केले जात आहे . तर, दुसरीकडे या एन्काऊंटर प्रश्नचिन्हदेखील उपस्थित करण्यात आले आहेत. हा एन्काऊंटर चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे, असे स्पष्ट मत काँग्रेस नेते शशी थरुर (Shashi Tharoor), सीपीएमचे नेते सिताराम येचुरी (Sitaram Yechury), भाजप नेत्या मेनका गांधी (Maneka Gandhi), ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी व्यक्त केले आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार देशात झालेल्या प्रत्येक एन्काउंटरची चौकशी व्हायला हवी अशी मागणीही केली जात आहे.

हैदराबाद येथे 30 डिसेंबर रोजी एका महिलेवर बलात्कार करुन तिचे मृतदेह जाळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यानंतर देशाभरातून संताप व्यक्त करत याप्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही केली जात होती. दरम्यान, गुरुवारी रात्री याप्रकरणातील चारही आरोपींनी पोलिसांच्या जाळ्यातून निसटण्याचा प्रयत्न केला. परिणामी, हैदराबाद पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करत त्यांना ठार केले. हैदराबाद पोलिसांनी चारही आरोपींना ठार केल्याची माहिती मिळताच संपूर्ण देशात आनंद साजरा करण्यास सुरुवात झाली. एकीकडे आनंद व्यक्त होत आहे तर, दुसरीकडे राजकीय नेत्यांनी या एन्काँऊटरवर प्रश्नचिन्ह निर्माण करुन सर्वांचे लक्ष केंद्रीत करुन घेतले आहे. हे देखील वाचा- Hyderabad Rape and Murder Case: आरोपींच्या एन्काउंटर बाबत उदयनराजे भोसले आणि चित्रा वाघ यांच्याकडून पोलिसांच्या कारवाईचे समर्थन

उज्जव निकम काय म्हणाले?

हैदराबाद बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींचे पोलिसांनी केलेले एन्काउंटर अयोग्य व कायद्याला धरून नव्हते,' असे स्पष्ट मत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे. 'झटपट न्याय मिळाल्यानंतर आनंद होणे स्वाभाविक आहे. पण तसा न्याय चंबळचे दरोडेखोरही द्यायचे. पण शेवटी ते दरोडेखोरच होते,' असेही निकम यांनी त्यावेळी सांगितले आहे.

शशी थरुर यांचे ट्वीट-

मेनका गांधी यांचे ट्वीट-

सिताराम येचुरी यांचे ट्वीट-

हैदराबाद येथील पोलिसांनी केलेल्या महत्वपूर्ण कारवाईवर स्थानिक महिलांनी आनंद व्यक्त केला आहे. हैदरबाद बलात्कार आणि हत्या केलेल्या आरोपींचा  एन्काऊंटर केल्यानंतर स्थानिक महिलेने संबधित पोलिसांच्या हातावर राखी बांधण्याचा कार्यक्रम साजरा केला.