Karnataka: कर्नाटकमध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशयातून पतीची पत्नी आणि तरुणाला झाडाला बांधून अमानुष मारहाण, एकास अटक
Beating | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कर्नाटकातील (Karnataka) म्हैसूर (Mysore) जिल्ह्यातील एका गावात 24 वर्षीय पुरुष आणि 30 वर्षीय महिलेला विजेच्या खांबाला बांधून तासनतास मारहाण (Beating) करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका व्यक्तीला अटक केली. कोळंदे पोलिसांनी (Kolande Police) सांगितले की, गावातील रहिवासी असलेल्या महिलेच्या लग्नानंतर तिला तीन मुले आहेत. परंतु हे जोडपे पाच वर्षांपूर्वी वेगळे झाले आणि त्यानंतर ती तिच्या पालकांसोबत राहत आहे. ती मजूर म्हणून काम करत होती आणि शेजारच्या गावातील तरुणाशी तिची मैत्री होती. गुरुवारी महिलेने तरुणाला चहासाठी बोलावले. काही वेळातच तिचा माजी पती आणि त्याचा भाऊ घरात घुसले, त्यांनी दोघांवर हल्ला केला

त्यांना विजेच्या खांबाला बांधून ठेवले आणि अनेक तास त्यांच्यावर हल्ला सुरूच ठेवला. नंतर व्हायरल झालेल्या एका मिनिटाच्या व्हिडीओमध्ये गावकरी दोघांना घेरलेले आणि त्यांना बांधलेले दिसत आहेत. ती महिला त्यांना सोडण्यासाठी विनवणी करते, परंतु कोणीही मदतीसाठी पुढे येत नाही. घटनेची माहिती समजल्यानंतर गावप्रमुखांनी हस्तक्षेप करून दोघांना सोडून दिले. हेही वाचा Covid 19 New Variant: दक्षिण आफ्रिकेत सापडला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; भारतामध्ये अलर्ट जारी, केंद्राने जारी केली At Risk देशांची यादी  

त्यांनीही शुक्रवारी सकाळी बैठक घेऊन परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सांगितले की शुक्रवारी सकाळी त्यांना सतर्क करण्यात आले त्यानंतर त्यांनी गावातून माजी पतीला अटक केली, तर त्याचा भाऊ फरार आहे. आम्ही गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू आहे, असे कोवलंडे स्टेशनच्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.