Salkanpur Temple Road Accident: सिहोर जिल्हात कार अनियंत्रित झाल्याने भीषण अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
Accident, Death प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

Salkanpur Temple Road Accident:  मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील सल्कानपूर येथे कारचा अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी हा अपघात घडून आला. अपघातात आणखी तीन जण जखमी झाले होते त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली. अपघातात एकून सहा जणांनी जीव गमावला आहे.  अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ वाहतुक सेवा विस्कळीत झाली. (हेही वाचा- ट्रकच्या धडकेत कारचा अपघात, नवरदेवासह चौघांचा होरपळून मृत्यू, झांसी येथील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात शुक्रवारी सांयकाळी 6.15 च्या दरम्यान भैरव खोऱ्यात घडला. कारमध्ये बसलेले प्रवाशी एकाच कुटुंबातील सदस्य होते. तीन महिन्यांच्या बाळाचे मुंडन करण्यासाठी मंदिरातून घरी परतत होते त्यावेळी काळाने घात केला. एसयुव्ही कारमध्ये 12 जण प्रवाशी होते. भरधाव वेगाने जात असलेली एसयुव्ही कार डीव्हाडरला धडकली. या धडकेत भीषण अपघात झाला.

अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. अपघातात कारचा अक्षरक्ष: चूराडा झाला. पोलिसांनी जखमींना नर्मद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री यांना या अपघातानंतर शोक व्यक्त केला आहे.