Jhansi Car Accident: उत्तर प्रदेशातील झाशी - कानपूर महामार्गावरील बारागाव येथे वराच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दुर्दैवाने या अपघातात नवऱ्यासह चार जणांचा अपघात झाला आहे. अपघातात कारने पेट घेतल्यानंतर पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. हा अपघात बारागाव पोलिस स्टेशनच्या पारिछा ओव्हर ब्रिजवर लग्नाच्या मिरवणूकीत झाला आहे. (हेही वाचा- तामिळनाडूतील शिवकाशी येथे फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 8 जणांचा मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार, कारमध्ये सात वर्षाचा मुलगा, नवरदेव आणि आणखी तीन जण होते. कारमधील दोन प्रवाशी कसेबसे वाचले. परंतु दोघे जण गंभीर जखमी झाले आहे. आयशर ट्रकची जोरात धडक लागल्याने हा अपघात घडून आला. ट्रकची जोरात धडक लागल्याने कार पलटली. अपघातात कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. आकाश अहिरवार (२५) असं मृत नवरदेवाचे नाव आहे. कारमध्ये आकाश सोबत भाऊ आशिष (२०) आणि पुतण्या इशू (७) प्रवास करते होते. आकाशचं १० मे रोजी लग्न होते. लग्नानंतर ते घरी परतत होते. आकाशचं लग्न झाल्यानंतर छप्पर गावातून वरात निघाली होती.
#BreakingNews : झांसी में भीषण सड़क हादसा, दो गाड़ियां आपस में भिड़ी#Jhansi #Accident | @anchorjiya pic.twitter.com/uuWIiCKRdF
— Zee News (@ZeeNews) May 11, 2024
अपघातानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर आग विझवली आणि आतून लोकांना बाहेर काढले. पोलिसांनी जखमींना वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले. अपघातनंतर रस्त्यावर बराच वेळ वाहतुक कोंडी झाली होती. पोलिसांनी काही वेळानंतर वाहतुक सेवा सुरळीत केली.