Tamil Nadu Blast: तामिळनाडूतील शिवकाशी येथे फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 8 जणांचा मृत्यू

तामिळनाडूच्या विरुधुनगरमधील शिवकाशी येथे गुरुवारी फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. सुदर्शन यांच्या मालकीच्या शिवकाशी येथील सेंगमलपट्टी येथील फटाक्यांच्या कारखान्यात गुरुवारी दुपारी झालेल्या स्फोटात कारखान्याच्या सात खोल्या उद्ध्वस्त झाल्या. स्थानिकांनी सांगितले की, स्फोटाची तीव्रता एवढी होती की सुमारे 1 किमी अंतरावरून मोठा आवाज ऐकू आला. स्फोटानंतर कारखान्यातून पांढरा धूर निघताना दिसत होता. ( Nagpur Auto Driver Molests School Girl: नागपूरात शाळेतून घरी सोडण्यापूर्वी रिक्षा चालकाकडून निर्जन स्थळी 10वी च्या विद्यार्थिनीचा विनयभंग; घृणास्पद प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोपी अटकेत)

विरूधुनगर जिल्ह्यातील फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला. त्यात पाच महिलांसह आठ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान पोहोचले आहेत. त्यांनी बचाव आणि मदतकार्य सुरू केलं आहे. कारखान्याला लागलेली आग नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारीमध्ये विरुधुनगर येथील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे ऑक्टोबर 2023 मध्ये विरुधुआनगरमधील रंगापालयम आणि किचनायकनपट्टी गावात फटाक्यांच्या दोन वेगवेगळ्या आगीच्या अपघातात 11 लोकांचा मृत्यू झाला होता.