Nagpur Auto Driver Molests School Girl: नागपूरात शाळेतून घरी सोडण्यापूर्वी रिक्षा चालकाकडून निर्जन स्थळी 10वी च्या विद्यार्थिनीचा विनयभंग; घृणास्पद प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोपी अटकेत
Girl | Representational image (Photo Credits: pxhere)

राज्यात महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं असताना एका चिमुरडीचा रिक्षा चालकाने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. दहावी मध्ये शिकणार्‍या मुलीला घरी परत सोडण्यापूर्वी तिला एका निर्जन स्थळी नेऊन तिच्यासोबत गैरवर्तवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना नागपूरच्या ओमकार नगर भागातील आहे. 25 वर्षीय रिक्षावाला मुलीला नेहमी सोड-आण करायला होता. पण त्याने बुधवारी एका निर्जळ स्थळी जाऊन मुलीचा विनयभंग केल्याचं समोर आलं आहे. या घृणास्पद घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

सोशल मीडीयातील व्हिडिओ नुसार, रिक्षावाला एका निर्जन स्थळी रिक्षा थांबवून बाहेर उतरला होता. त्याने मागे बसलेल्या मुलीला अनेकदा चूकीच्या पद्धतीने हात लावला. तिने त्याला विरोध केला. रिक्षामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान TOI च्या रिपोर्टनुसार पीडीत तरूणी या प्रकारानंतर धक्क्यामध्ये आहे. हा रिक्षावाला मागील 2 वर्षांपासून तिला शाळेतून ने-आण करण्यासाठी होता. Molestation Case In Mumbai: अ‍ॅन्टॉप हिल भागात 16 वर्षीय मुलीचा शिक्षकाकडून विनयभंग.

एक जोडपं या रस्त्यावर असताना त्यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी मोबाईल मध्ये सारा प्रकार रेकॉर्ड केला नंतर पोलिसांनी या व्हिडिओ च्या आधारे रिक्षा चालकाच्या मुसक्या आवळल्या. अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाविरूद्ध पोलिसांनी रिक्षा चालकावर पोक्सो अंतर्गतही गुन्हा दाखल केला आहे. अंजनी पोलिस स्टेशन मध्ये मुलीच्या आई वडिलांनी गुन्हा दाखल केला आहे.