Hit-and-Run in Nagpur: नागपुरात हिट अँड रन झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण आहे. या अपघातात दोन मजुरांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. दारूच्या नशेत बेदरकारपणे गाडी चालवत असताना चालकाने फूटपाथवर झोपलेल्या 8 मजुरांना चिरडले. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. यावेळी चालक अल्पवयीन असून तो मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहितीही समोर आली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
घटनेनुसार, रस्त्यावर खेळणी विकून उदरनिर्वाह करणाऱ्या महिला व लहान मुले फूटपाथवर झोपत होती. दिवसभराच्या मेहनतीनंतर हे लोक गाढ झोपले होते. दरम्यान, रात्री 12.15 च्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या चालकाने या झोपलेल्या मजुरांवर आपली कार चालवली आणि या गरीब लोकांचा मृत्यू झाला. भूषण लांजेवार असे या कार चालक आरोपीचे नाव आहे. भरधाव वेगात आलेल्या कारने नियंत्रण सुटून तीन महिला, चार मुले आणि एका पुरुषाला चिरडले. त्यांना चिरडल्यानंतर वाहन फूटपाथला धडकले. यावेळी सर्वत्र रक्त दिसत होते.