दिल्ली (Delhi) एनसीआरमध्ये (NCR) काल रात्रीपासून मुसळधार पाऊस (Rain) सुरू आहे. प्रदीर्घ पावसामुळे हवामानाचा नमुना बदलला असून तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. तापमान 27 अंशांवर पोहोचले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात पाऊस सुरू झाला. यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शनिवारी राजधानीत ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. अनेक भागात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट सुरू राहणार आहे. प्रादेशिक हवामान विभागानुसार (Weather department) शुक्रवारी कमाल तापमान सामान्यपेक्षा 32.8 अंश सेल्सिअस कमी आणि किमान तापमान सामान्यपेक्षा 27.3 अंश सेल्सिअस अधिक होते. त्याचवेळी संध्याकाळी 5.30 पर्यंत 11 मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या 24 तासांत हवेतील आर्द्रतेची पातळी 70 ते 97 टक्के होती.
मुसळधार पावसामुळे दिल्लीतील अनेक भागांना पूर आला आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. शहरातील आझाद मार्केट अंडरपासमध्ये दीड फुटांपर्यंत पाणी साचले आहे, त्यामुळे हा रस्ता बंद करावा लागला आहे. याशिवाय आयटीओ परिसरातील अंडरपासमध्येही पाणी साचले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज आहे. हेही वाचा Vande Bharat Trains च्या नव्या गाड्या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज; पहा काय आहे खासियत
भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, दिल्लीच्या तीन जिल्ह्यांमध्ये या मान्सूनच्या हंगामात आतापर्यंत कमी पाऊस पडला आहे. तर चार जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस झाला आहे. 1 जूनपासून 491.6 मिमीच्या सामान्य पावसाच्या तुलनेत ईशान्य दिल्लीमध्ये फक्त 154 मिमी पाऊस पडला आहे. दुसरीकडे, पूर्व दिल्लीमध्ये आतापर्यंत 297.8 मिमी पाऊस पडला आहे, जो सामान्यपेक्षा 39 टक्के कमी आहे. दक्षिण दिल्लीमध्ये आतापर्यंत 371.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे, जी सामान्यपेक्षा 24 टक्के कमी आहे.
Traffic movement at Minto Bridge closed due to waterlogging as Delhi receives heavy rain pic.twitter.com/LqdfAR69xM
— ANI (@ANI) August 21, 2021
1 जूनपासून राजधानीत सरासरी 431 मिमी पाऊस पडला आहे. तर सामान्य पाऊस 412.1 मिमी आहे. 11 जुलैपर्यंत भारतातील सर्वात कमी पाऊस असलेल्या मध्य दिल्लीमध्ये 26 टक्के अधिक पाऊस झाला आहे. हवामान खात्याच्या मते, फक्त उत्तर दिल्लीत 677.7 मिमी पाऊस पडला आहे, जो सामान्यपेक्षा जास्त आहे. हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यात दिल्लीत सामान्य पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जे सरासरीच्या 95 ते 106 टक्के असू शकते. ऑगस्टमध्ये राजधानीत 247.7 मिमी पाऊस पडतो.
हवामान विभागाने 23 ऑगस्टपर्यंत तेलंगणा, ओडिशा, हरियाणा, पंजाब, दिल्ली, रायलसीमा, तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. हवामान विभागाने सांगितले की अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, दक्षिण आंतरिक कर्नाटक, किनारी कर्नाटक, महाराष्ट्र आणि केरळमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, पूर्व राजस्थान, सौराष्ट्र आणि कच्छ या भागात हलका पाऊस पडू शकतो.