Gujarat News: गुजरात येथील सूरतमध्ये अवघ्या 400 रुपयांसाठी एकाची हत्या करण्यात आली आहे. तरुणाची हत्येची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तरुणाची हत्या झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या चौकशीतून असे समोर आले की, आरोपी आणि मृत तरुण दोघे ही मित्र आहेत. (हेही वाचा- दोन वाहनांची भीषण धडक, एका चालकाचा मृत्यू, जोगेश्वरी येथील घटना)
मिळेलेल्या माहितीनुसार, सूरतच्या नानपूरा मक्काई पूल वर्तुळाजवळ ११ मार्चला एक मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांना तरुणाचा मृतदेह तात्काळ शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तरुणाची हत्या झाल्याचे शवविच्छेदनातून समोर आले. मृताच्या डोक्याला गंभीर लागल्याने त्याचा मृत्यू झाला. गुजरात पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर तपासले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक जण तरुणाला मारहाणा करताना दिसत आहे.
पोलिसांनी तपासातून एकाला अटक केले आहे. रामकिशोर प्रधान असं आरोपीचे नाव आहे. चौकशीतून असे समोर आले की, रामकिशोर आणि मृत तरुण हे दोघेही फुटपाथवर राहायचे. दोघांमध्ये 400 रुपयांवरून भांडण झाले होते. रागाच्या भरात रामकिशोरने पुरिया उर्फ भूरीया याला मारहाण केली. मारहाणीत भूरियाताला डोक्याला गंभीर दुखापत झाली. मारहाणीनंतर रामकिशोर घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला ताब्यात घेतले.