Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Mumbai Accident: मुंबई पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोगेश्वरी येथे ट्रकची समोरासमोर धडक होऊन एका ४० वर्षीय ऑइल टॅंकर चालकाचा गुरुवारी मृत्यू झाला. वनराई पोलिसांनी ट्रकचालक रफीउल्ला खान याला अटक केली. रात्रीचे 12.45  हा अपघात घडून आला.  अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहे. हेही वाचा- लोकल ट्रेनमधून पडून पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू, कोपर रेल्वे स्थानकावरील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीचे बारा वाजता एक तेल टॅंकर (DD01 KL 9230) वांद्राच्या दिशेने जात होता. तर एक ट्रक (MH 43 BG 1769) विरुध्द दिशेने म्हणजे बोरिवलीच्या दिशेने जात होता. एनपीसीआय मेट्रो स्थानकाजवळ आले असताना एका ट्रक चालकाचे गाडीवर वरिल नियत्रंण सुटले आणि भीषण अपघात घडून आला. ऑइल टँकर चालक विनोद कुमार यादव (४०) यांचे नियंत्रण सुटले आणि ते दुभाजकावरून पलटले. त्याचवेळी ट्रक जवळ आल्याने समोरासमोर धढक झाली.

अपघातात एका ट्रॅक चालकाला गंभीर दुखापत झाली. यादव याला डोक्याला गंभीर जखम झाली.त्यामुळे खूप रक्तस्त्राव झाल्याने त्याला जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले पंरतु त्याला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी वनराई पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आला. पोलिसांनी येऊन खानला अटक केली. मृत हा नवी मुंबईतील ऐरोली येथे राहणारा असून, आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील अमेठी येथील आहे.