महिलेवर गुंडांचा भरदिवसा हल्ला; हवेत गोळीबार करून धमकावण्याचा प्रयत्न (Video)
महिलेवर हल्ला (संग्रहित-संपादित प्रतिमा)

बिहार : भारतातील काही राज्यांचे स्थान नकाशावर नेहमीच डागाळलेले राहिले आहे. सरकार, कायदा, नियम यांची नेहमीच इथे पायमल्ली केली जाते. त्यात महिलांचा आदर आणि सन्मान या गोष्टी तर लांबच राहिल्या.  यातीलच एक राज्य म्हणजे बिहार. अशातच पुन्हा एकदा इथे चालत असलेल्या गुंडाराजचे उदाहरण समोर आले आहे. आश्चर्य म्हणजे यावेळी या टोळीने हल्ला चढवला आहे तो एका महिलेवर. खंडणी दिली नाही म्हणून बिहारमधील 5-6 लोकांनी या महिलेवर हल्ला केला. याचसोबत घाबरवण्यासाठी हवेत गोळीबार देखील केला असल्याची धक्कादायक बातमी मिळत आहे. या गोष्टीचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून, सोशल मिडीयावर या गोष्टीबाबत टीकेची झोड उठत आहे.

ही महिला एका खासगी शाळेची मालकीण आहे. या गुडांनी तिच्याकडे खंडणीची मागणी केली होती. मात्र या महिलेने ही खंडणी देण्यास नकार दिला. त्यानंतर या गुंडांनी या महिलेला अडवून तिच्यावर हल्ला चढवला, तिला मारायला सुरुवात केली. एका व्यक्तीने या गुडांना अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी हवेत गोळीबार करण्यास सुरुवात केली. शेवटी या महिलेला धमकी देऊन हे गुंड तिथून निघून गेले.  एएनआय या वृत्तसंस्थेने या व्हिडीओ पोस्ट केला आहे. दरम्यान, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला असून, लवकरच त्यांना अटक केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली.