Gold Rates (Photo Credits: Pixabay)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण (Nirmala Sitharaman) यांनी सोमवारी (1 फेब्रुवारी) देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2021) सादर केला आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून सोन्याचांदीवरील आयात शुल्क (Import Tax) 5 टक्क्यांनी घटवण्यात आला आहे. ज्यामुळे सोन्याचांदीच्या किंमतीवर (Gold Rate) मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे. अर्थसंकल्पानंतर आज (2 फेब्रुवारी) सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा आजचा दर 0.6 टक्क्याने घाली आला आहे. यामुळे प्रति तोळा सोन्याची किंमत 48 हजार 438 इतकी झाली आहे.

लॉकडाऊनपासून सोन्याचे दर गगणाला भिडले होते. या काळात सोन्याच्या दराने जवळपास 60 हजारांचा टप्पा गाठला होता. मात्र, केंद्र सरकारने सोन्याचांदीवरील आयात शुल्क कमी केले आहे. ज्यामुळे सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाल्याचे आहे. सध्या सोन्याचांदीवर 12.5 टक्के आयात शुल्क द्यावे लागत आहे, या कपातीच्या निर्णयानंतर केवळ 7.5 टक्के आयात शुल्क द्यावे लागेल. यामुळे आणखी काही प्रमाणात सोन्याचांदीचे दर कमी होण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा- Union Budget 2021: या अर्थसंकल्पात कोणत्या वस्तू स्वस्त आणि काय होणार महाग? वाचा सविस्तर

शुद्ध सोने कसे ओळखले जाते?

सोन्यावर हॉलमार्कचे चिन्ह आणि 999, 916, किंवा 875 असे अंक लिहलेले असतात. याच अंकावरून सोन्याची शुद्धता लक्षात येते. हॉलमार्कच्या चिन्हाबरोबर 999 हा अंक असेल तर, सोने 24 कॅरेट असते. 999 चा अर्थ असा आहे की, यामधील सोन्याची शुद्धता 99.9 टक्के आहे. 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेट सोन्यावर 916, 21 कॅरेट सोन्यावर 875 तर, 18 कॅरेट सोन्यावर 750 हे अंक असतात.