Image | (Photo credit: archived, edited, representative image)

कोरोनामुळे लॉकडाऊन, अनलॉकिंगनंतर उर्वरित बाजारात व्यापार काहीसे ठप्प आहेत. आंतराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती (Gold price) वाढल्याने भारतीय सराफा बाजारात मोठी तेजी आल्याने सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून सोने 900 रुपयांनी स्वस्त झाले आहे. बुधवारी सोन्याची किंमतीत 1 हजार 400 रुपयांनी वाढ झाल्याने सोने 54 हजार 900 रुपये प्रति तोळावर पोहचले होते. मात्र, शनिवारी सोन्याच्या किंमतीत 900 रुपयांची घट झाल्याने सोन्याचा भाव 54 हजारावर आले आहे. सोन्याच्या दरात मागील महिनाभरापासून सोन्याचे दरात सातत्याने होणाऱ्या भाव वाढीमुळे सराफा व्यवसायिकांचीही चिंता वाढली आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात 7 जुलै रोजी सोने 49 हजार 200 वर होते. त्यानंतर 14 जुलै रोजी सोन्याचे भाव 800 रुपयांनी वाढून ते 50 हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहचले होते. त्यानंतर 21 जुलै रोजी पुन्हा एक हजाराने वाढ झाली व ते 51 हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. २८ जुलै रोजी सोन्याच्या दरात पुन्हा अडीच हजार रुपयांनी वाढ झाली. ज्यामुळे सोन्याचा दर 50 हजार 500 रुपयांवर गेला. बुधवारी 29 जुलै रोजी तर एकाच दिवसात त्यात आणखी 1 हजार 400 रुपयांची वाढ झाली व सोने 54 हजार 900 रुपये प्रति तोळा झाले होते. तेंव्हापासून सोने त्याच भावावर होते. शनिवार, १ ऑगस्ट रोजी त्यात ९०० रुपयांनी घसरण झाल्याने ते 54 हजार रुपयांवर आले आहे. हे देखील वाचा- Income Tax Return Filing New Date: आर्थिक वर्ष 2018-19 चा ITR भरण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शुद्ध सोने कसे ओळखले जाते?

सोन्यावर हॉलमार्कचे चिन्ह आणि 999, 916, किंवा 875 असे अंक लिहलेले असतात. याच अंकावरून सोन्याची शुद्धता लक्षात येते. हॉलमार्कच्या चिन्हाबरोबर 999 हा अंक असेल तर, सोने 24 कॅरेट असते. 999 चा अर्थ असा आहे की, यामधील सोन्याची शुद्धता 99.9 टक्के आहे. 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेट सोन्यावर 916, 21 कॅरेट सोन्यावर 875 तर, 18 कॅरेट सोन्यावर 750 हे अंक असतात.

दरम्यान कोरोना विषाणूचे संकट संपूर्ण जगावर ओढावल्याने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. देशासह राज्यात कोरोनाचे संकट कायम असून कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोना बाथितांचा आकडा 16 लाख 95 हजार 988 वर पोहचला आहे. यापैकी 36 हजार 511 जणांचा मृत्यू झाला असून 10 लाख 94 हजार 374 जणांनी कोरोनावर मात केली आहे.