Income Tax Return File | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

कोरोना संकटकाळामध्ये केंद्र सरकारने यंदा कर दात्यांना एक मोठा दिलासा आहे. यामध्ये केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) ने 2018-19 चा आयटीआर भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. पूर्वी 31 जुलै ही असलेली अंतिम तारीख आता 30 सप्टेंबर करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही यंदा इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) दाखल केला नसेल तर तो तुम्ही 30 सप्टेंबर पर्यंत भरू शकता.

दरम्यान काल ट्वीटरच्या माध्यमातून माहिती देताना, कोरोना व्हायरस स्थितीच्या पार्श्वभूमीवर आता यंदाचा आयटीआर दाखल करण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ देत असल्याचं सांगत त्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे अशी माहिती दिली आहे. सुरूवातीला 31 मार्च वरून 31 जुलै आणि आता 31 जुलै वरून 30 सप्टेंबर पर्यंत त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. ही तिसर्‍यांदा देण्यात आलेली मुदतवाढ आहे.

Income Tax India Tweet

 

सध्या देशामध्ये कोरोना व्हायरसमुळे सारेच आर्थिक व्यवहार विस्कळीत झाले आहे. देशामध्ये आता कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 31 ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मात्र आता हळूहळू नियमांमध्ये शिथिलता देखील देण्यात आली आहे. बॅंकेचे देखील व्यवहार शक्यतो ऑनलाईन करण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.