Gold Price Today: सोने- चांदीचे भाव वाढले, जाणून घ्या आजचे दर
सोन्याचे दर (फोटो सौजन्य-ट्वीटर)

सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. विदेशातील सोन्याचांदीच्या भावापेक्षा दिल्ली सराफ बजारात मंगळवारी सोने 25 रुपयांच्या भाववाढीसह 34,475 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. तर अखिल भारतीय सराफ संघाच्या अनुसार औद्योगिक उद्योगातल भाववाढ आणि नाणे निर्मितीच्या संख्येत वाढ झाल्याने चांदीचे भाव 170 रुपयांनी वाढून 41,700 रुपये एवढे झाले आहेत.

बाजार सूत्रांनी असे सांगितले की, विदेशातील मजबूत भाववाढ वाढीमुळे सोन्याचे भाव इतर ठिकाणी ही वाढले आहेत. जागतिक स्तरावर न्यूयॉर्क येथे सोन्याचा भाव 1,315.33 प्रति डॉलर आणि चांदी 15.88 डॉलर अशा भाववाढीने किंमती वाढल्या आहेत. सोमवारी सुद्धा सोन्याचे भाव 340 रुपयांनी वाढले होते.

राजधानी दिल्ली येथे 99.9 टक्के किंवा 99.5 टक्के शुद्ध सोन्याचे भाव 25-25 रुपये वाढून क्रमश: 34,475 रुपये तर 34,325 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तर गिन्नीची किंमत 26,100 रुपये प्रति आठ ग्रॅमवर स्थित झाले.

चांदीच्या तयार मूळ रुपात 170 रुपये भाववाढ होऊन 41,700 रुपये प्रति किलो तर आठवड्यातील चांदी डिलिव्हरीचा भाव 208 रुपये वाढून 40,645 रुपये किलो झाला आहे. तर दिल्लीत सोन्याची किंमत 34,325 रुपये, मुंबईत 33,350 रुपये, कोलकाता मध्ये 32,070 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.