Gold Price Today: सोनेच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजची नवी किंमत
Gold | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

कोरोनामुळे लॉकडाऊन, अनलॉकिंगनंतर उर्वरित बाजारात व्यापार काहीसे ठप्प आहेत. मात्र, आंतराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती (Gold Rate) वाढल्याने भारतीय सराफा बाजारात मोठी तेजी आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. ऑगस्ट महिन्यात सोन्याची किंमतीने 56 हजाराचा टप्पा गाठला होता. मात्र, शुक्रवारी (21 ऑगस्ट) या दरात 0.29 टक्क्यांची घसरण होऊन प्रतितोळे दर 52,001 वर स्थिर झाले आहे.

सोन्याच्या दरात 4 हजारपेक्षा अधिकची घट झाली आहे. या आठवड्यात सोने-चांदीचे दर जवळपास स्थिर होते. आठवड्याच्या सरुवातीलाच 17 ऑगस्टला सोन्याचे दर 52 हजार 151 रुपये प्रति तोळा होते. तर चांदीचे दर 67 हजार 106 रुपये प्रति किलो इतके होते. हे देखील वाचा-चीनला मोठा झटका! केंद्राने रद्द केली 44 सेमी हायस्पीड ‘वंदे भारत’ ट्रेनची निविदा

सोन्यावर हॉलमार्कचे चिन्ह आणि 999, 916, किंवा 875 असे अंक लिहलेले असतात. याच अंकावरून सोन्याची शुद्धता लक्षात येते. हॉलमार्कच्या चिन्हाबरोबर 999 हा अंक असेल तर, सोने 24 कॅरेट असते. 999 चा अर्थ असा आहे की, यामधील सोन्याची शुद्धता 99.9 टक्के आहे. 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेट सोन्यावर 916, 21 कॅरेट सोन्यावर 875 तर, 18 कॅरेट सोन्यावर 750 हे अंक असतात. हे देखील वाचा-